09 March 2021

News Flash

‘शोले’ची चाळीशी: चित्रपटाच्या काही खास गोष्टी

जी.पी.सिप्पी निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित बहुचर्चित शोले चित्रपटाला १५ ऑगस्ट रोजी चाळीस वर्षे पूर्ण करीत आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटाबाबतच्या काही वेगळ्या गोष्टी-

| August 14, 2015 01:21 am

जी.पी.सिप्पी निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित बहुचर्चित शोले चित्रपटाला १५ ऑगस्ट रोजी चाळीस वर्षे पूर्ण करीत आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटाबाबतच्या काही वेगळ्या गोष्टी-

* ‘शोले’चे चित्रीकरण ३ नोव्हेंबर १९७३ रोजी बंगळुरूजवळ चित्रपटासाठी उभारलेल्या रामगढ या गावाच्या सेटवर सुरू झाले. चित्रीकरणानंतर हा सेट रितसर गाव झाले.

* गब्बरसिंगच्या भूमिकेसाठी शत्रुघ्न सिन्हाने नकार दिल्यानंतर डॅनी डेन्झोपास विचारणा करण्यात आली होती. पण तेव्हा तो दुसऱया चित्रपटात व्यस्त असल्यामुळे आता कोणाला निवडायचे हा यक्ष प्रश्न होता. पटकथाकार सलीम-जावेद जोडीतील जावेदने एका हिंदी नाटकात अमजद खानला पाहून त्याचे नाव सुचवले होते. तोपर्यंत अमजदने हिंदुस्तान की कसम या चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती.

* ‘शोले’चा मिनर्व्हामधील १४ ऑगस्ट रात्री ९ वाजताचा प्रिमिअर ३५ एम.एम.स्वरूपात दाखवला गेला. कारण, इंग्लंडवरून येणारी या चित्रपटाची ७० एमएमची प्रिंट विमानतळावरून कस्टमच्या तावडीतून बाहेर पडण्यास वेळ लागला. त्यामुळे रात्री बारानंतर मिनर्व्हामध्ये पुन्हा एकदा शोलेची ७० एमएमची प्रिंट आणि स्टिरीओफोनीक साऊंड अशी प्रिंट पाहिली गेली.

* शोले मुंबईत मिनर्व्हा व न्यू एक्सेसियर येथे ७० एम.एम स्वरूपात झळकला, तर इतरत्र ३५ एम.एम स्वरूपात होता. पैकी न्यू एक्सेसियरमधून तो दोन आठवड्यांत काढून घेतला गेला (ते पूर्वकरारानुसार होते). पण मिनर्व्हात शोले पाहणे विलक्षण थ्रील होते. मिनर्व्हात तेव्हा शोलेसाठी अप्पर स्टॉल ४ रुपये ४० पैसे, तर बाल्कनीसाठी ५ रुपये ५० पैसे असे दर होते.

* ‘शोले’च्या स्पर्धेत तेव्हा विनोदकुमार यांचा गरीबी हटावो हा चित्रपट होता. मात्र, त्याचा ‘शोले’समोर निभाव लागणे शक्य नव्हते.

* ‘शोले’च्या संवादाची ध्वनिफीत प्रकाशित झाली त्यावेळी ती बारशापासून सत्यनारायणाच्या महापुजेपर्यंत ती समाजात सर्वत्र समारंभात लावली गेली. ध्वनिफीत ऐकण्यासाठी मोठी गर्दी होत असे.

* ‘शोले’पूर्वी रमेश सिप्पीने ‘अंदाज’, ‘सीता और गीता’ यांचे व नंतर ‘शान’, ‘सागर’, ‘भ्रष्टाचार’, ‘अकेला’, ‘जमाना दिवाना’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. पण ते ‘शोले’ची उंची गाठू शकले नाहीत.

* ३ जानेवारी २०१४ रोजी ‘शोले’ थ्रीडी स्वरूपात झळकला, तर १९ एप्रिल २०१५ रोजी ‘शोले’ पाकिस्तानात प्रदर्शित झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 1:21 am

Web Title: interesting facts about sholay
टॅग : Sholay
Next Stories
1 व्हिडिओ : खऱ्याखुऱ्या माणसांच्या स्वप्नांचा ‘डबल सीट’ प्रवास
2 नेताजी सुभाषचंद्रांच्या जीवनावरील चित्रपटाच्या गीतासाठी लतादीदींना विनंती
3 श्रीदेवी आणि अनुराग कश्यपच्या मुलींसोबतचा सैफच्या मुलाचा फोटो व्हायरल
Just Now!
X