News Flash

आमिर खानच्या मुलीचा बॉयफ्रेंडसोबत फोटो व्हायरल; एकत्र एन्जॉय करत आहेत व्हेकेशन

आयरा खान सध्या बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. या दोघांनाही काजामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असताना स्पॉट करण्यात आलं.

(Photos: Nupur Shikare, Ira Khan/Instagram)

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानची मुलगी आयरा खान सध्या सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेला डेट करत असल्याने बरीच चर्चेत आलीय. दोघे एकमेकांसोबत खूपच क्यूट दिसून येत असतात. आयरा खानचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोजमध्ये हे स्पष्ट दिसून येतं. आयरा खान सध्या बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत ‘व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

आयरा आणि नुपूर गेले काही वर्षे एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा ते दोघे एकमेकांसोबत स्पॉट होतात. काही महिन्यांपूर्वीच आयराने आपली रिलेशनशिप ओपन केली होती. आयरा खान आणि बॉयफ्रेंड नुपूर शिखरे हे दोघेही सध्या काजामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवताना दिसून येत आहेत. नुपूर शिखरने याने स्वतः दोघांचे काजामधील काही फोटोज त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते दोघे स्ट्रीट डॉग्ससोबत खेळताना दिसून आले. फोटो शेअर करताना नुपूरने एक कॅप्शन देखील लिहिलीय. “आम्ही काही मित्र बनवले आहेत”, असं लिहीत त्याने हे फोटोज शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Popeye (@nupur_shikhare)

यावेळी आयराने ब्लॅक स्वेटर आणि ब्लू लेगिंग्स परिधान केलेली दिसून आली. तर नुपूर शिखरे ब्लॅक जॅकेट आणि ब्लू जीन्समध्ये खूपच हॅंडसम दिसून येत होता. या दोघांनाही काजा इथल्या एका कॅफेबाहेर स्ट्रीट डॉग्ससोबत खेळताना स्पॉट करण्यात आलंय.

त्यांचे हे फोटोज सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरू लागले आहेत. दोघांचे हे फोटो त्यांच्या चाहत्यांना फारच आवडत आहेत. त्यांच्या केमिस्ट्रीवर कमेंट्सही मिळत आहेत. सोशल मीडियावर नेहमीच आयरा नुपूरसोबत फोटो शेअरर करत असते. आयरा ही चित्रपटात काम करत नसली तरी तिचे सोशल मीडियावर अकाउंटवर तिचे अनेक चाहते आहेत. आयरा खानचे सुमारे 431 हजार फॉलोअर्स आहेत.

आयराला तिच्या वडिलांप्रमाणे अभिनय करण्यात रस नाही. तिला पडद्यामागे राहून काम करायचं आहे, असं तिने अनेकदा सांगितलं आहे. यापूर्वी तिने युवराज सिंगची पत्नी हेजल कीचसोबत एका शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 10:25 pm

Web Title: ira khan spending quality time with boyfriend nupur shikhare in kaza prp 93
Next Stories
1 अभिनेत्री जेनिफर विंगेट करोना पॉझिटिव्ह; सुरू करणार होती ‘कोड एम २’चं शूटिंग
2 जेव्हा राज कुंद्रा म्हणाला होता, “मला गरिबीचा तिरस्कार आहे, म्हणून मी श्रीमंत बनलो….”
3 The Kapil Sharma Show: भारती सिंहला मोठा झटका; म्हणाली, “७० ते ५० टक्के कमी फीसमध्ये काम करावं लागतंय…”
Just Now!
X