28 November 2020

News Flash

‘प्यार तूने क्या किया’च्या ११ व्या सिझनमध्ये झळकणार इशा सिंग

२४ ऑक्टोबर २०२० पासून या शोच्या नव्या सिझनची सुरूवात होत आहे.

चांगली प्रेमकथा ही प्रेक्षकांना नक्कीच आवडते आणि झिंग वाहिनीच्या ‘प्यार तूने क्या किया’ या शोमध्ये अशाच प्रेमकथा दाखवल्या जातात. २४ ऑक्टोबर २०२० पासून या शोच्या नव्या सिझनची सुरूवात होत आहे. नव्या सिझनमधील एका एपिसोडमध्ये झी टीव्हीवरील ‘इश्क सुभान अल्ला’ फेम अभिनेत्री इशा सिंग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

“प्यार तुने क्या किया हा एक सुंदर कार्यक्रम माझ्या वाट्‌याला आला असून मी त्याला नाही म्हणूच शकले नाही. या नव्या सिझनसाठी मी उत्सुक आहे कारण यात युवा पिढीच्या आयुष्यात प्रेमाचे काय स्थान आहे आणि ते त्याला हाताळण्यासाठी काय काय करतात ते दाखवण्यात येणार आहे. यात माझी प्रीत ही व्यक्तिरेखा अतिशय सकारात्मक, लाघवी आहे. एपिसोडची संकल्पना आणि कथा सध्याच्या परिस्थितीशी अगदी मिळतीजुळती आहे”, असं तिने भूमिकेविषयी सांगितलं.

ही मालिका २४ ऑक्टोबरपासून शनिवारी संध्याकाळी ७ वाजता ‘झिंग’ वाहिनीवर प्रसारित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 6:50 pm

Web Title: isha singh in new season of pyar tune kya kiya ssv 92
Next Stories
1 ‘स्कॅम १९९२’ IMDb वर पहिल्या क्रमांकावर? हंसल मेहतांनी केला खुलासा
2 Mirzapur 2 : दुसऱ्या सिझनसाठी पाच पटीने जास्त पैसे झाले खर्च; जाणून घ्या किती आहे बजेट?
3 दिशानं शेअर केलेल्या चित्रावरून वाद; अर्जेटिनाचा चित्रकार झाला नाराज
Just Now!
X