23 February 2019

News Flash

Video : प्रिया वारियरला इशान खट्टर देत आहे अशी टक्कर

इशानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रिया वारियरला इशान खट्टर देत आहे टक्कर

‘मानिक्य मलरया पूवी’ या गाण्यातून अवघ्या काही सेकंदांसाठी झळकलेली, आपल्या प्रियकराला नजरेच्या बाणाने घायाळ करणारी अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर सोशल मीडियावर भलतीच लोकप्रिय झाली. ‘उरु अदार लव्ह’ या चित्रपटातील एका गाण्याने प्रियाला रातोरात यशाच्या परमोच्च शिखरावर नेऊन ठेवलं. तिचं भुवया उंचावणं आणि हळूच हसणं अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवून गेलं. पण आता नुकताच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला अभिनेता इशान खट्टर तिला टक्कर देत आहे.

इशानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका बॉलिवूड गाण्यावर तो लिप सिंक करताना दिसत आहे. या व्हिडिओतील इशानचे हावभाव मजेशीर असून नेटकऱ्यांना त्याचा हा अंदाज आवडत आहे. त्याच्या एका फॅन क्लबने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला असून अनेकांनी तो लाइक केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

वाचा : मादाम तुसाँ संग्रहालयात अनुष्काचा बोलका पुतळा 

‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या इशानच्या अभिनयाची प्रशंसा अनेकांकडून करण्यात आली आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘धडक’ हा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. याच चित्रपटातून दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

First Published on July 11, 2018 7:00 pm

Web Title: ishaan khattar funny expression video viral on social media