News Flash

तेरी फॅमिली को मार दूंगा अगर…,’बिग बॉस’ स्पर्धकाच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

या संदर्भात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे

बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून चर्चेत आलेली जोडी म्हणजे जन सम्राट अनुप जलोटा आणि जसलीन मथारू. पण सध्या जसलीन एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिच्या कुटुंबीयांना कोणी तरी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. जसलीनच्या कुटुंबीयांना लगेच पोलीस ठाण्यात धाव घेतली असून घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला आहे. जसलीनने तर घरा बाहेर पडणे देखील बंद केल्याचे म्हटले जाते.

काही दिवसांपूर्वी जसलीनचे वडिल केसर मथारु यांना एक फोन आला होता. हा फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्याकडे काही पैसे मागितले आणि जर पैसे दिले नाहीत तर कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. जसलीनच्या वडिलांनी लगेच ओशिवरा पोलिस ठाण्यात या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

‘धमकी देणारा फोन मला आला होता. जसलीनला नाही. जेव्हा पोलिसांनी या बाबत चौकशी करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी आमच्या बिल्डींगच्या सुरक्षिततेची तपासणी केली. ज्या व्यक्तीने मला फोन केला होता त्याने मला आणि माझ्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी दिली होती’ असा खुलासा केसर मथारु यांनी स्पॉटबॉयशी बोलताना केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 12:43 pm

Web Title: jasleen matharus dad gets an extortion call teri family ko maar doonga if you dont pay avb 95
Next Stories
1 हा लोकप्रिय अभिनेता ठरला सर्वांत आकर्षक पुरूष
2 मुलांना करोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी संगीतकाराने स्वत:ला केले काचेच्या पेटीत बंद
3 Coronavirus : घरी बसून कंटाळलात? आता ओटीटी प्लॅटफॉर्म देतोय फ्री सबस्क्रिप्शन
Just Now!
X