14 October 2019

News Flash

ज्योतिबाच्या चरणी शिवा-सिद्धीच्या नव्या नात्याची सुरुवात ?

प्रत्येक नातं प्रेम आणि विश्वास यावर आधारलेला असतं

प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील लग्न हा फार मोठं क्षण असतो. लग्नानंतर मुलीचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. ती स्वत:च घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाते. नवे घर, नवीन नाती, नवीन मंडळी, नव्या पद्धती सगळच नवीन असतं. प्रत्येक नातं प्रेम आणि विश्वास यावर आधारलेला असतं. त्यातच नवरा आणि बायको हे नातं तर अत्यंत महत्वाचं असतं. मात्र ज्या व्यक्तीचा आपण दु:स्वास करतो त्याच्याबरोबर जेव्हा आयुष्याची गाठ बांधली जाईल तेव्हा काय होईल ? याचा अंदाज आपण लावू शकतो. ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेमध्ये देखील असंच शिवा आणि सिद्धीच्या बाबतीत झालं आहे. आत्याबाईंनी या दोघांचंही त्यांच्या मनाविरुद्ध लग्न लावून दिलं आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच ही जोडी देवदर्शनाला गेली असून ज्योतिबाला हे दोघं कोणतं साकडं घालणार याकडे साऱ्यांचं लक्ष वेधल आहे.

आत्याबाईंनी स्वार्थापोटी शिवा आणि सिद्धीचं लग्न लावून दिलं खरं पण या दोघांचं भविष्य काय आहे ? हा तिरस्कार त्यांच्या नात्याला कुठे घेऊन जाईल ? या गोष्टीशी दोघेही अनभिज्ञ आहेत. परंपरेनुसार, नव्या नवरा-नवरीने लग्नानंतर एकदा जोड्याने जाऊन ज्योतिबाचे आशीर्वाद घ्यायचे असतात. आता शिवाच्या घरचे त्यांना ज्योतिबाच्या दर्शनाला घेऊन जाणार आहेत. हा विधी एका नव्या नात्याची सुरुवात करून देणारा क्षण ठरणार आहे हे नक्की !

शिवा आणि सिद्धीच्या लग्नात बरेच विघ्न आले आणि दोघांच्या मनाविरुध्द हे लग्न झाले. दोघांनाही या लग्न बंधनामधून सुटका हवी आहे. हे दोघेही ज्योतिबाच्या दर्शनास जायला तयार झाले आहेत पण, या प्रथेनुसार नवऱ्याने बायकोला उचलून पायऱ्या चढायच्या असतात.आता दोघांनाही हा विधी करण कठीण जाणार आहे. परंतु हा विधी पार पाडण्याशिवाय या दोघांनाही दुसरा कुठलाही पर्याय नाही. या सगळ्यामध्ये शिवा आणि सिद्धी ज्योतीबाला काय साकडं घालतील ? मालिकेमध्ये पुढे काय होईल ? कसा असेल शिवा – सिद्धीचा लग्नानंतरचा प्रवास ? हे बघणे रंजक असणार आहे. तेव्हा नक्की बघा जीव झाला येडापिसा मालिकेचा विशेष भाग या आठवड्यामध्ये रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.

First Published on May 16, 2019 12:47 pm

Web Title: jeev jhala weda pisa siddhi and shiva jotiba darshan