News Flash

बूटी शेक काय आहे? आशा भोसलेंची नक्कल करत जॅमीने उडवली टोनीची खिल्ली

पाहा व्हिडीओ

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कॉमेडियन जॉनी लिव्हर यांची मुलगी जॅमी लिव्हर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सतत सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिचे व्हिडीओ पाहून ती वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत असल्याचे म्हटले जाते. आता जॅमीने आणखी एक कॉमेडि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

जॅमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जॅमी लोकप्रिय गायिका आशा भोसले यांची मिमिक्री करताना दिसत आहे. या व्हिडीओत जॅमी आशा भोसले यांची मिमिक्री करत म्हणते, “नेहा कक्कडचा भाऊ टोनी आहे ना त्याला मी टोनू बोलते, त्याची गाणी मस्त असतात, चला ऐकूया…मिल्कशेक ऐकलं आहे. आता तर प्रोटीन शेक पण आलं आहे. हे बूटी शेक काय आहे?” हे म्हणत जॅमी टोनीला चिडवताना दिसते. हा व्हिडीओ शेअर करत जॅमीने “हे कोणतं शेक आहे?” असा प्रश्न कॅप्शनमध्ये टोनी कक्करला टॅग करत विचारला आहे.

२०१२मध्ये जॅमीच्या करिअरची सुरूवात स्टॅंडअप कॉमेडियन म्हणून झाली होती. जॅमीने ‘किस किस को प्यार करूं’ आणि ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘हाऊसफुल ४’ मध्ये तिने गिगलीची भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 4:08 pm

Web Title: johnie lever daughter jamie lever make fun of tony kakkar song as asha bhosle dcp 98
Next Stories
1 पश्चिम बंगालमध्ये करोना लस घेणाऱ्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; तपास सुरु
2 IPL 2021 : “मुंबईत आयपीएलचे सामने खेळवू शकता, मग…”; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा BCCI ला सवाल
3 इसाबेल कैफच्या ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटाचा पोस्टर शेअर करत, सलमान म्हणाला…
Just Now!
X