अभिनेत्री कंगना रणौत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. कधी बॉलिवूडवर आरोप करणं तर कधी देशातील घडामोडींवर खळबळजनक वक्तव्य करणं. यामुळे कंगना अनेकदा अडचणीत सापडली आहे. आता पुन्हा एकदा कंगनाला आलेल्या एका अडचणीमुळे  न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे. पासपोर्ट प्राधिकरणाने कंगनाच्या पासपोर्ट रिन्यूअल म्हणजेच नूतनीकरणास नकार दिला आहे.

कंगनावर वांद्रे पोलिस स्थानकात देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्याने तिच्या पासपोर्ट नूतनीकरणासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. कंगना रणौतला  तिच्या धाकड सिनेमाच्या शूटिंगसाठी हंगेरी या देशात जायचं आहे. मात्र कंगनाचा पासपोर्ट १५ सप्टेंबरपर्यंतच वैध असल्याने तिला पासपोर्टचं तातडीने नूतनीकरण करणं गरजेचं आहे. अन्यथा कंगनाला परदेशवारी करण्यात मर्यादा येऊ शकतात. यासाठीच कंगनाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मंगळवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

हे देखील वाचा: ‘पवित्र रिश्ता-२’मध्ये अंकिता लोखंडेसोबत ‘हा’ अभिनेता झळकणार मानवच्या भूमिकेत

कंगनाने दाखल केली याचिका

कंगनाने वकील रिजवान सिद्दीकी यांच्या मार्फत याचिका दाखल केलीय. यात “कंगनाला १५ जून ते १० ऑगस्ट या काळात बूडापेस्ट आणि हंगेरीमध्ये प्रवास करायाचा आहे. ‘धाकड’ सिनेमाच्या दुसऱ्या शेड्यूलचं शूटिंग बाकी आहे.” यासाठी कंगनाला प्रवास करणं महत्वाचं असल्याचं या याचिकेत म्हंटलं आहे. तसचं कंगनाने आधीच शूटिंगसाठी कमिटमेंट केल्या आहेत. परदेशात प्रोडक्शन हाऊसकडूनही सर्व तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे कंगनाचं तिथे पोहचणं महत्वाचं आहे असं म्हणतं पासपोर्ट रिन्यू करण्यात यावं अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.

हे देखील वाचा: ‘दर्या किनारी…’ गाण्यावर ‘तारक मेहता…’मधील दयाबेनचा कोळी डान्स व्हायरल, बोल्ड लूक पाहून चाहते थक्क

काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात कंगना आणि तिची बहिण रंगोलीवर वांद्रे पोलिस ठाण्यात मुनव्वर अली सैय्यद यांनी गुन्हा दाखल केला होता. मुनव्वर बॉलिवूडमध्ये कास्टिंग डायरेक्टर आणि फिटनेस ट्रेनर आहेत. कंगना आणि रंगोरीच्या काही ट्वीट आणि वक्तव्यांवरून मुनव्वर यांनी कंगनावर ती बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असून दोन समूदायात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर कंगना आणि रंगोलीवर धार्मिक तेढ निर्माण करणं(कलम १५३ अ), जाणीवपूर्वक धार्मिक भावनां दुखावणं(कलम २९५ अ) या आरोपांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.