बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना आपलं मत व्यक्त करत असते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा ती वादातही अडकली आहे. आता कंगनाची एक जूनी मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत कंगनाने गोऱ्यारंगावर वक्तव्य केलं आहे.

कंगनाने वर्णभेदावर वक्तव्य केलं असून फेअरनेस ब्रँडची जाहिरात करण्यावर तिने नकार दिला आहे. ‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, “मी स्वत:ची जागा तयार करण्याचा प्रयत्न केला आणि हा मोठा संघर्ष होता. मला जे काम दिले मी तेच केले असते. तर मला नाही वाटतं मी इथ पर्यंत येऊ शकली असते. त्यांच्यासाठी सुंदर असणे म्हणजे गोरं असणे आहे. मी खूप गोरी होते आणि मी आणखी ३ ते ४ वर्ष तिथे टिकले असते, जे की कोणतीही गोरी व्यक्ती करू शकते. त्यांना फक्त हेच पाहिजे. पण मला ते आवडतं नाही. माझा गोरा रंग माझ्या सगळ्यात कमी आवडणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे,” असे कंगना म्हणाली होती.

गोऱ्या रंगावर कंगना पहिल्यांदाच बोलली नाही. या आधी २०१३ मध्ये एका मुलाखतीत कंगनाने यावर वक्तव्य केले होते. तेव्हा कंगना म्हणाली होती की “लहान असल्यापासून मला गोऱ्यारंगाची संकल्पना समजली नाही. आपण लोकप्रिय असल्यामुळे आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत. आणि जर मी फेअरनेस क्रीमच्या जाहिरती केल्या तर तरुणांसाठी हे एक चांगल उदाहरण नसेल.”

दरम्यान, कंगनाने ट्वीट करत तिचं डायटं शेअर केलं आहे. फोटो शेअर करत कंगनाने तिचं डायट प्लॅन शेअर केलं आहे.

आणखी वाचा : “तुम्ही राक्षस आहात”, करोना काळात बनावट औषध विकणाऱ्यांवर संतापला फरहान अख्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कंगना लवकरच थलायवी या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच कंगना ‘धाकड’ आणि ‘तेजस’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.