26 February 2021

News Flash

सुशांत-साराच्या अफेअरच्या चर्चांवर बोलताना कंगना म्हणाली, ‘हृतिकवर माझे खरे…’

तिचे हे ट्विट चर्चेत आहे..

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. त्याच्या चित्रपटांपासून ते त्याच्या रिलेशनशीपपर्यंत अनेक गोष्टी समोर येत आहेत. आता नुकताच सुशांतच्या मित्राने पोस्ट करत सुशांत आणि अभिनेत्री सारा अली खान हे दोघे रिलेशनमध्ये असल्याचे म्हटले. तसेच बॉलिवूडमधील माफियांच्या दबावामुळे बहुतेक साराने ब्रेकअप केल्याचे देखील पोस्टमध्ये म्हटले होते. या चर्चांवर अभिनेत्री कंगना रणौतने देखील वक्तव्य केले. पण तिने त्यावेळी हृतिकसोबतच्या नात्याविषयी देखील वक्तव्य करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

कंगनाने सारा आणि सुशांतच्या रिलेशनवर बोलताना एकेकाळी चर्चेत असलेल्या तिच्या रिलेशनवर देखील वक्तव्य केले. ‘मला असे वाटते की साराचे नक्कीच सुशांतवर प्रेम असणार. सुशांत वेडा नाही. तो अशा मुलीवर प्रेम करणार नाही जी त्याच्यावर प्रेम करत नाही. पण सारावर थोडा दबाव असणार. माझ्याबाबतीत बोलायचे झाले तर माझे हृतिकवर खरे प्रेम होते. आजही या गोष्टीवर माझ्या मनात शंका नाही. पण हृतिक अचानक कसा बदलला हे मला आजपर्यंत कळालेले नाही’ या आशयाचे ट्विट कंगनाने केले होते.

आणखी वाचा- ‘स्टारकिड्स स्वप्न दाखवतात आणि नंतर…’, सारा- सुशांतच्या नात्याच्या चर्चांवर कंगनाचे वक्तव्य

यापूर्वी कंगनाने सुशांत आणि साराच्या रिलेशनशीपची बातमी शेअर करत ट्विट केले होते. सारा आणि सुशांतच्या अफेअरच्या चर्चा सध्या मीडियामध्ये पाहायला मिळतात. आउटडोर शूटिंगच्या वेळी दोघांनी एकच रुम शेअर केली होती. का हे फॅन्सी नेपोटिजम किड्स संवेदनशील आउटसायर्डसला स्वप्न दाखवतात आणि नंतर त्यांना सर्वांसमोर सोडून देतात? या आशयाचे ट्विट कंगनाने केले असून तिने सारावर निशाणा साधला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 12:56 pm

Web Title: kangana ranaut says her relation with hrithik was genuine avb 95
Next Stories
1 ‘यांच्यासाठी धमकी देणारे नॉर्मल आहेत’, असे म्हणत पूजा भट्ट संतापली
2 गणेशोत्सवात मंत्रमुग्ध करणारी बाप्पांची ‘ही’ खास गाणी
3 Video : कमी मानधन ते मराठी सिनेसृष्टीतली कंपूशाही; लेखक क्षितिज पटवर्धनची बेधडक मुलाखत
Just Now!
X