X

“कंगनाच्या बुद्धीला संपूर्ण लॉकडाउन लागलंय!”; महाराष्ट्र सरकारवरील टीकेनंतर कंगना ट्रोल

कंगना रणौैत पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा नेटकऱ्यांची नाराजी ओढावून घेतली आहे. महाराष्ट्र सरकरावर केलेल्या टीकेनंतर कंगनाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकार विरोधातल्या ट्विटमध्ये कंगनाने ‘चंगू मंगू गँग’ असा उल्लेख केल्याने नेटकऱ्यांचा संताप वाढला आहे.

करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता महाराष्ट्र सरकारने अनेक ठिकाणी नाईट कर्फ्यू लावला असून अनेक निर्बंध लादले आहेत. यावर ट्विट करत कंगना म्हणाली आहे, ” कुणी मला सांगू शकेल का महाराष्ट्रात लॉकडाउन आहे? सेमी लॉकडाउन? दिखावा किंवा बनावटी लॉकडाउन आहे? काय सुरुय इथं? असं वाटतं कुणी कठोर निर्णय घेऊ इच्छित नाही. डोक्यावर टांगती तलवार असताना चंगू मंगू गँग, ते राहतील की नाही या त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढत बसले आहेत.” असं ती म्हणाली आहे.

महाराष्ट्रातील सरकारवर निशाणा साधणाऱ्य़ा कंगनाला मात्र या ट्विटमुळे ट्रोल व्हावं लागलं आहे. अनेकांनी कंगनाला म्हंटलं आहे की “तू चंगू मंगू गँग” हा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी तर वापरला नाहीस ना? त्यांचे उपकार विसरलीस ”

तर एका युजरने कंगनाच्या या पोस्टवर म्हंटलं आहे, ” महाराष्ट्राचं माहित नाही पण कंगनाच्या बुद्धीला लॉकडाउन लागलंय.”

‘हॅरी पॉटर’मधील पद्मा पाटीलची भूमिका साकारणारी ‘ही’ अभिनेत्री होणार आई!

येत्या काळात म्हणजेच 23 एप्रिलला कंगनाचा ‘थलायवी’ हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र करोनाच्या संकटामुळे सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलंय. यासोबतच कंगना तिचे आगामी सिनेमा ‘तेजस’ आणि धाडकच्या शूटिंगमध्ये सध्या व्यस्त आहे.

21
READ IN APP
X