29 October 2020

News Flash

कपिल शर्मा एका एपिसोडसाठी घेतो इतकं मानधन; आकडा ऐकाल तर व्हाल थक्क

कमाईमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनाही टाकलं मागे

टिव्ही विश्वातील नावाजलेलं नाव म्हणजे विनोदवीर कपिल शर्मा. आपल्या विनोदीशैलीमुळे अनेकांच्या मनात घर केलेल्या कपिलमुळे हा शो लोकप्रियतेमध्ये प्रथम स्थानावर आहे. या कार्यक्रमामध्ये कपिल शर्मा आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांचे विनोद चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीत उतरत असतात. त्यामुळे प्रेक्षकांना खळखळून हसविणाऱ्या या कलाकारांचं नेमकं मानधन किती असेल असा प्रश्न चाहत्यांना कायम पडत असेल. परंतु जर तुम्ही कपिल शर्माचं एका एपिसोडचं मानधन ऐकलं तर थक्क व्हाल.

कपिल शर्मा या शोमध्ये अनेक मोठमोठ्य चित्रपटांचं प्रमोशन करण्यात येतं. त्यामुळे आपल्या विनोदाने अनेकांना हसविणारा कपिल या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही करतो. सहाजिकचं तो या भूमिकेसाठी चांगलं मानधन घेत असणार अशी शक्यता आहे. साधारणपणे अशा रिअॅलिटी शोसाठी कलाकार पाच ते सात लाखांपर्यंत मानधन घेतात. परंतु कपिल एका एपिसोडसाठी जे मानधन घेतो ते बॉलिवूड सेलिब्रिटींनाही मागे टाकणारं आहे.

कपिल त्याच्या एका भागासाठी ८० ते ९० लाख रुपये मानधन घेत असल्याचं सांगण्यात येत आहे. तसं या शोव्यतिरिक्त कपिल अनेक ब्रॅण्डचा सदिच्छादूतदेखील आहे.विशेष म्हणजे एखाद्या कंपनीच्या जाहिरातीसाठी तो एक कोटी रुपये मानधन आकारतो. कपिलने २०१४-१५ मध्ये आपल्या मानधनात वाढ केल्याचं सांगण्यात येतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 10:57 am

Web Title: kapil sharma charges so much money for laughing for an hour ssj 93
Next Stories
1 तापसीनं घडवली अद्दल; स्पर्श करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचं मोडलं बोट
2 ग्रेट! अक्षय कुमार करतोय ‘मिशन मंगल’च्या दिग्दर्शकाच्या उपचारांचा खर्च
3 रोहित शर्माच्या ‘त्या’ षटकारावर अमिताभ म्हणाले…
Just Now!
X