News Flash

जान्हवी कपूरमुळे तुटला कार्तिक-करणचा ‘दोस्ताना’ ? जान्हवीला फिल्ममधून बाहेर करण्याचा होता प्रयत्न

....म्हणून करण जोहरने कार्तिकला केलं बाहेर

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन ‘दोस्ताना २’ मधून बाहेर पडल्यानंतर सध्या तो चर्चेचा विषय बनलाय. धर्मा प्रोडक्शनने अभिनेता कार्तिकला ‘दोस्ताना २’ चित्रपटातून बाहेर काढलं. पंरतू दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता कार्तिक आर्यन या दोघांपैकी एकानेही यामागचं कारण सांगितलं नाही. फिल्ममधून अभिनेता कार्तिकसोबत अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत झळकणार होती. या चित्रपटाची जवळजवळ ६० टक्केपेक्षा जास्त शूटिंग झाली होती. तसेच कोट्यावधी रूपये खर्च करण्यात आले होते. इतकी मोठी जोखीम उचलून दिग्दर्शक करण जोहरने अभिनेता कार्तिकला चित्रपटातून बाहेर काढलं.

अभिनेता कार्तिकला चित्रपटातून बाहेर काढण्यामागची अनेक कारणे आतापर्यंत समोर आली आहेत. त्यानंतर पुन्हा एक नवं कारण समोर आलंय. चित्रपटा दरम्यान जानेवारी महिन्यात अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर या दोघांची भांडणं झाली होती. तेव्हापासून अभिनेता कार्तिक जान्हवीसोबत काम करायला तयार नव्हता. त्याला जान्हवी कपूर सोबत काम शक्य नव्हतं आणि म्हणून तो कायम शूटिंगच्या तारखा बदलत राहीला. त्यामूळे चित्रपटाच्या शूटिंगसाठी सुद्धा उशीर होऊ लागला.

अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत झालेल्या भांडणानंतर अभिनेता कार्तिक हा थोडा निराश होता. अखेर एक दिवस अभिनेता कार्तिक आर्यनने चित्रपटाच्या दिग्दर्शकाला सांगितलं की, या चित्रपटाच्या व्यतिरिक्त आणखी दुसरं नवं काही तरी करायला हवं. त्यावेळी जान्हवीने कार्तिकसोबत बोलणं जवळजवळ बंद केलं होतं. दिग्दर्शकाने ताबडतोब करण जोहरकडे जाऊन अभिनेता कार्तिक दुसरा चित्रपट करण्याचं बोलत आहे, असं सांगितलं.

त्यानंतर करण जोहरने समजवल्यानंतर अभिनेता कार्तिक ‘दोस्ताना २’ करण्यास तयार झाला होता. पण यासाठी अभिनेत्री जान्हवीला काढून टाकण्याची अट त्याने करण जोहरकडे घातली. जर करण जोहरने दुसरा चित्रपटा करायची तयारी दाखवली असती तर अभिनेता कार्तिक कमी पॅकेजमध्ये सुद्धा काम करायला तयार होता. पडद्याच्या मागे जे काही घडत होतं ते सगळं प्रेक्षकांसाठी शॉकींग तर नक्कीच होतं. हे सगळं पाहून या गोष्टी आणखी पुढे वाढू नयेत म्हणून मग दिग्दर्शक करण जोहरने निर्णय घेतला आणि अभिनेता कार्तिकला चित्रपटातून बाहेर काढलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2021 1:37 pm

Web Title: karan johar fire kartik aaryan from dostana 2 because of kartik and janhvi kapoor rift actor wanted to drop janhvi from this film prp 93
Next Stories
1 ‘ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो’, लता दीदींनी केले BKC कोव्हिड हॉस्पिटलच्या डीनचे कौतुक
2 IPL स्थगित झाल्यानंतर करोना रुग्णांसाठी ‘विरुष्का’चा पुढाकार; निधी गोळा करण्यासाठी पोस्ट केला व्हिडिओ
3 हिमालयातल्या मोदीबाबांना देशातल्या ऑक्सिजनचं महत्त्व ते काय? – राम गोपाल वर्मा
Just Now!
X