News Flash

अमृताच्या पार्टीला करण जोहर आणि मलायका-अर्जुनची हजेरी, फोटो व्हायरल

पाहा फोटो

या पार्टीत गौरी खान, संजय कपूर आणि महीप कपूर सुद्धा उपस्थित होते. (Photo credit : maheep kapoor instagram story)

बॉलिवूड म्हटलं की सगळ्यांसमोर येतं ते म्हणजे त्यांचे ग्लॅमरस जीवन, त्यांची मैत्री, अफेअर्स आणि पार्टीज. स्टार कलाकार पासून स्टारकिड्स पर्यंत यांच्यातील मैत्रीचे घट्ट नाते सगळ्यांना नेहमीच पाहायला मिळते. काल रात्री बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी एकत्र येत पार्टी केली आहे. या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

यातले काही फोटो महीप कपूर म्हणजेच अभिनेता संजय कपूरने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. तर काही करण जोहरने त्याच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केले आहेत. या पार्टीमध्ये करण जोहर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, महीप कपूर, मनिष मल्होत्रा, गौरी खान, करिश्मा कपूर, संजय कपूर आणि नताशा पूनावाला उपस्थित होते. या पार्टीचे आयोजन मलायक अरोराची बहीन अमृता अरोराने तिच्या राहत्या घरी केले होते. मलायकाने लाल रंगाचे कपडे परिधान केले असून ती हॉट दिसतं आहे.

करोना संसर्गाच्या काळानंतर पहिल्यांदा अनेक स्टार्सला आपण एकत्र पाहिलं आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की बेबो म्हणजे करीना कपूर खान कुठे आहे. करीना नेहमीच करिश्मा, मलायका आणि अमृता अरोरासोबत पार्टी करताना दिसते. मात्र, या फोटोमध्ये कुठेच करीनानसल्याने तिच्या चाहत्यांसमोप अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 12:04 pm

Web Title: karan johar has a catching up session with besties arjun kapoor gf malaika arora karisma kapoor gauri khan and others enjoy a fun evening inside pics dcp 98
Next Stories
1 “जीना इसी का नाम है”; जन्मदिनानिमित्ताने फारुख शेख यांच्याबद्दल खास गोष्टी
2 सुझान खानच्या ‘त्या’ पोस्टवर हृतिकची कमेंट, म्हणाला…
3 ‘थलायवी’चा ट्रेलर पाहताच राम गोपाल वर्मायांनी कंगनाचं केलं कौतुक, कंगना म्हणाली…
Just Now!
X