कर्नाटक विधानसभा निवडणूकींचा निकाल लागला आणि पुन्हा एकदा देशात भाजपाचीच लाट असल्याचं सिद्ध झालं. ज्यानंतर सोशल मीडियापासून कलाविश्वापर्यंत सर्वत्र या निवडणूक निकालांचेच पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर कर्नाटक निवडणूक निकालांच्या निमित्ताने अभिनेता प्रकाश राज यांच्यावरही अनेकांनीच तोफ डागल्याचं पाहायला मिळालं. या निवडुकांच्या प्रचारादरम्यान त्यांनी कानडी जनतेने भाजपाला मतं देऊ नये असं आवाहन केलं होतं. इतकंच नव्हे तर यादरम्यान त्यांची पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा मुद्दाही उचलून धरला होता. पण, अखेर मतदार राजाने त्यांच्या कौल कोणाच्या बाजूने दिला हे आता स्पष्ट झालंच आहे.

भाजपाला कर्नाटक निवडणूकांमध्ये मिळालेल्या यशानंतर प्रकाश राज यांना नेटकऱ्यांनी चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. कर्नाटक विधानसभांच्या निवडणुकांपूर्वी त्यांनी ट्विट करत कर्नाटकमध्ये भाजपाची सत्ता येणार नाही याबद्दलचा आत्मविश्वास व्यक्त केला होता. पण, आता मात्र ते तोंडघशी पडल्याचं पाहायला मिळत आहे. प्रकाश राज आता कुठे लपून बसले आहेत, ‘कोणीतरी त्यांना शोधा’, अशा आशयाचे ट्विट अनेकांनीच केले आहेत. तर काहींनी त्यांचे मिम्स बनवत या प्रकरणाला एका विनोदी अंगाने सादर केलं आहे. कोणी त्यांच्या ‘सिंघम’ चित्रपटातील ‘और बढाओ भाईचारा’ या वाक्याची मदत घेत त्यांच्यावर निशाणा साधलाय, तर कोणी आणखी वेगळ्या पद्धतीने त्यांना ट्रोल केल्याचं पाहायला मिळालं आहे.

वाचा : ‘फोडा आणि राज्य करा हे भाजपाचे धोरण कर्नाटकात चालणार नाही’

https://twitter.com/ggiittiikkaa/status/996272160170704896

https://twitter.com/AmitShahArmy/status/996275969789849600

प्रकाश राज यांच्या राजकीय विचारांविषयी आणि वेळोवेळी ते करत असणाऱ्या मतप्रदर्शनांविषयी नेहमीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. इतकच नव्हे तर देशातील सरकारची निंदा केल्यामुळे मला हिंदी चित्रपटसृष्टीत काम मिळणं बंदच झालं आहे, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ही अडचण अजूनतरी आलेली नाही असंही त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.