30 November 2020

News Flash

बिग बॉसच्या घरात होणार कविता कौशिकची एण्ट्री

'कुमकुम भाग्य' मालिकेतील नैना सिंहची देखील एण्ट्री होणार आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. बॉलिवूडचा भाईजान सूत्रसंचालन करत असलेला बिग बॉस १४ सध्या प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. आता शोमध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे. दोन नव्या स्पर्धकांची एण्ट्री होणार आहे.

बिग बॉस १४मध्ये ‘एफआयआर’ मालिकेतील अभिनेत्री कविता कौशिक आणि ‘कुमकुम भाग्य’ मालिकेतील नैना सिंह यांची वाइल्ड कार्ड एण्ट्री होणार आहे. तसेच घरात एण्ट्री करताच कविता घराची पहिली कॅप्टन होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

शोच्या निर्मात्यांनी घरात एक नवी ट्विस्ट आणला आहे. त्यामुळे घराची पहिली कॅप्टन कविका कौशिक होणार असल्याचे म्हटले जात आहे. जर कविताची घरात एण्ट्री होताच ती कॅप्टन झाली तर बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांच्या प्रतिक्रिया काय असणार हे पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

कविता आणि नैना यांना शोमध्ये पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. त्यांची घरात एण्ट्री झाल्यानंतर इतर स्पर्धकांच्या काय प्रतिक्रिया असणार हे पाहण्यासारखे असणार आहे. तसेच बिग बॉस १४च्या घरातून सारा गुरपाल आणि शहजाद देओल हे दोन स्पर्धक नॉमिनेट होऊन घराबाहेर आले आहेत. सध्या पवित्रा पूनिया आणि एजाज खान हे स्पर्धक रेड झोन मध्ये आहेत. तसेच सीनिअर्स सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान आणि हिना खान हे देखील गेल्या आठवड्यात घरातून बाहेर पडले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 5:46 pm

Web Title: kavita kaushik and naina singh join as wildcard contestants in big boss 14 avb 95
Next Stories
1 रामायण, महाभारत घडलं तेव्हा केवळ हिंदूच होते का?; अभिनेत्याच्या प्रश्नावर कंगनानं दिलं उत्तर
2 नोरा फतेहीने कपिल शर्मा शोमध्ये केला भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
3 दिशाने धनुष्यबाण दाखवत दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा; फोटो होतोय व्हायरल…
Just Now!
X