दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा K.G.F Chapter 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. अलिकडेच K.G.F Chapter 2 चं नवं पोस्टर देखील प्रदर्शित झालं होतं. या पोस्टरमधून संजय दत्तचा खलनायक लूक समोर आला होता. मात्र हा चित्रपट संजय दत्तमुळे लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण संजय दत्तला चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. शिवाय उपचारासाठी तो परदेशात जाणार असल्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत K.G.F चं चित्रीकरण कसं पूर्ण होणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र चाहत्यांच्या प्रश्नावर चित्रपटाचे निर्माते कार्तिक गौडा यांनी प्रतिक्रिया दिली. प्रेक्षकांनी काळजी करु नये, K.G.F Chapter 2 ठरलेल्या दिवशीच प्रदर्शित होईल असं त्यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – सुशांत मृत्यू प्रकरण: अभिनेते शेखर सुमन यांनी केली रियाच्या अटकेची मागणी

सर्वाधिक वाचकपसंती – “हे तर धर्मांधतेचं लक्षण”; बंगळुरुमधील घटनेवर प्रकाश राज संतापले

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक गौडा यांनी KGF 2 वर भाष्य केलं. “चित्रपटाचं शूटिंग जवळपास पूर्ण झालं आहे. संजय दत्तचे केवळ तीन सीन बाकी आहे. शिवाय आम्ही तीन महिन्यानंतर चित्रीकरण सुरु करणार आहोत. तो पर्यंत संजय पूर्णपणे बरा होईल अशी आम्हाला खात्री आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी काळजी करु नये. K.G.F Chapter 2 ठरलेल्या दिवशीच प्रदर्शित होईल.” अशी प्रतिक्रिया कार्तिक गौडा यांनी दिली.

कर्करोगाचं निदान झाल्यानंतर संजय लवकरच उपचारांसाठी विदेशात जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र संजय दत्तला डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आता त्याला चौथ्या टप्प्यातील कर्करोग असल्याचं निदान झालं आहे.