News Flash

कियारा अडवाणीला साकारायची आहे मधुबालाची भूमिका !

बॉलिवूडमधील ग्लॅमरस ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल फॅन्ससोबत गप्पा मारण्यासाठी कियाराने लाइव्ह सेशल केलं. यावेळी तिने ही इच्छा व्यक्त केली.

कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री कियारा आडवाणीला बॉलिवूडमध्ये ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. यापूर्वी तिने सुशांत सिहं राजपूतसोबत ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ मध्ये साक्षी रावतची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर तिला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. प्रत्येक कलाकाराची अत्यंत लाडकी, अजून न साकारलेली एकतरी भूमिका असतेच जी पडद्यावर साकारायची मनस्वी इच्छा असते. अभिनेत्री कियारा अडवाणीची देखील अशीच इच्छा आहे. कियाराने तिच्या या लाडक्या भूमिकेबाबत चाहत्यांशी शेअर केलं आहे.

अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. बॉलिवूडमधील ग्लॅमरस ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन करण्यासाठी तिने देशभरातील तिच्या फॅन्ससोबत गप्पा मारल्या. तिच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत नुकतंच ती तिच्या इन्स्टाग्रामवर लाइव्ह आली होती. यावेळी तिच्या फॅन्सनी तिला आगामी प्रोजेक्ट्स, आवडते कलाकारांबद्दल प्रश्न विचारले. या लाइव्ह सेशन दरम्यान अभिनेत्री कियाराने बॉलिवूडमधल्या तिच्या प्रवासाबाबत देखील चर्चा केली.

या लाइव्ह सेशनमध्ये तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिलीय. लाइव्ह सेशन दरम्यान तिच्या एका फॅनने भविष्यात एखाद्या बायोपिकमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर तिला कुणाची भूमिका करायला आवडेल, असा प्रश्न केला. यावर उत्तर देताना अभिनेत्री कियारा म्हणाली, “मला मधूबालाची भूमिका साकारण्याची खूप इच्छा आहे. “, असं म्हणाली. तसंच हे तिचं स्वप्न असल्याचं देखील तिने यावेळी सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes (@etimes)

कियाराने हे लाइव्ह सेशन तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलंय. अभिनेत्री कियारा अडवाणीचे इन्स्टाग्राम अकाउंटवर १७.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. कियाराचे बॉलिवूडमधले ग्लॅमरस ७ वर्षे सेलिब्रेट करण्यासाठी इन्स्टाग्रामवरील तिचे एकूण ४० फॅन पेज एकत्र आले होते. वेगवेगळ्या वयोगटातील तिच्या फॅन्सनी तिचं अभिनंदन केलं.

अभिनेत्री कियाराने १३ जून २०१४ रोजी ‘फगली’ चित्रपटातून डेब्यू केलं होतं. त्यानंतर ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ मध्ये तिने आपला दमदार अभिनय दाखवत स्वःला सिद्ध केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 7:05 pm

Web Title: kiara advani wants to do a madhubala biopic prp 93
Next Stories
1 संपत्तीच्या वादातून आईचं अपहरण केल्याचा अभिनेत्रीचा आरोप; पंतप्रधानांकडे मागितली मदत
2 ‘मी एलिमिनेट होऊन एका दिवसात परतणार याची आई-बाबांना खात्री होती’, मुग्धा वैशंपायनचा खुलासा
3 ‘गाथा नवनाथांची’ नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X