25 October 2020

News Flash

‘छत्रीवाली’ मालिकेतील विक्रमच्या ‘कबीर सिंग’ लूकची चर्चा

एक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर

स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ मालिकेत नवं वळण आलंय. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या विक्रम-मधुरामधलं नातं आता संपलंय. आपल्या वडिलांचा खून विक्रमच्या वडिलांनीच केलाय हे कटू सत्य मधुरासमोर उघड झाल्यानंतर मधुराने विक्रमपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. विक्रमने मधुराची माफी मागितली, तिला मनवण्याचा प्रयत्नही केला पण मधुरा मात्र तिच्या मतावर ठाम राहिली. मधुराच्या निर्णयाने खचलेला विक्रम आजही आपलं प्रेम विसरलेला नाही. नातं संपलं असलं तरी प्रेम नाही. आजही मधुरा परत येईल असा विश्वास त्याला वाटतोय. विक्रम-मधुराला पुन्हा एकत्र आणणारा क्षण मालिकेत येईल का याची उत्सुकता आहे.

खास बात म्हणजे विक्रमच्या बदललेल्या लूकला प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या कबीर सिंह सिनेमातल्या शाहिद कपूरच्या लूकशी मिळता-जुळता असा विक्रमचा लूक आहे. मधुराचं मन पुन्हा जिंकण्यात विक्रमला यश मिळणार का? हे ‘छत्रीवाली’ मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 4:56 pm

Web Title: leap in chhatriwali serial vikram comes back in kabir singh look ssv 92
Next Stories
1 विद्या बालन पहिल्यांदाच करणार या लघूपटाची निर्मिती
2 रणबीरसोबत लग्नाची तयारी सुरू; आलियाने सब्यसाचीकडून ऑर्डर केला लेहंगा?
3 शाळांमध्ये ‘सेक्स एज्युकेशन’ अनिवार्य करणं गरजेचं-सोनाक्षी सिन्हा
Just Now!
X