कलाविश्वात आज असे असंख्य कलाकार आहेत, ज्यांनी केवळ प्रेक्षकांचं मनोरंजनच केलं नाही, तर त्यांच्या मनावर राज्य केलं. यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकारांविषयी फारसं काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आपल्या विनोदबुद्धीने या कलाकारांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं आणि थेट त्यांच्या घरात स्थान मिळवलं. त्यामुळेच हे कलाकार खऱ्या आयुष्यात कसे आहेत. त्यांची जीवनशैली कशी आहे हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना कायमच उत्सुकता असते.
अलिकेडच ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातील कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी या कलाकारांनी त्यांची मत, त्यांचे विचार दिलखुलासपणे मांडले.
अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले या दोघांची पडद्यावर जशी मैत्री पाहायला मिळते. तशीच निखळ मैत्री त्यांची पडद्यामागेदेखील आहे. तर अभिनेता प्रभाकर मोरे आणि रसिका वेंगुर्लेकर यांनीदेखील त्यांच्या करिअरमधील अनेक गोष्टींचा खुलासा केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 24, 2021 12:15 pm