02 December 2020

News Flash

जिजाच्या बाललीला पाहून तुमचंही हरपेल भान; पाहा ‘हा’ गोड व्हिडीओ

आदिनाथने शेअर केला जिजाचा गोड व्हिडीओ

लहान मुलं त्यांच्या बाललीलांमुळे कायमच सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतात. त्यामुळे कलाविश्वातही असे अनेक स्टारकिड आहेत जे कायमच सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत असतात. यामध्ये बॉलिवूड स्टारकिड्स सगळ्यांनाच माहित आहेत. मात्र, मराठी कलाविश्वातदेखील असे अनेक स्टारकिड्स आहेत जे कायम चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतात. यातलंच एक नाव म्हणजे आदिनाथ व उर्मिला कोठारे यांची लेक जिजा.

सोशल मीडियावर जिजा ही कायमच चर्चेचा विषय ठरत असते. अनेकदा उर्मिला किंवा आदिनाथ जिजाचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. यामध्ये अलिकडेच आदिनाथने जिजाचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जिजा निरागसपणे कबुतरासोबत गप्पा मारताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare)


या व्हिडीओमध्ये जिजा कबुतराला तांदळाचे दाणे खायला देत असून त्याच्याशी गप्पा मारताना दिसत आहे. विशेष म्हणजे तू शिजलेला भात खाणार का असा प्रश्नही त्याला विचारते. तर मध्येच बाबा, हा बोलतच नाही माझ्याशी अशी मिश्कील तक्रारदेखील करते. त्यामुळे सध्या जिजाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, सध्याच्या घडीला मराठी कलाविश्वातील लोकप्रिय स्टारकीडपैकी जिजा आघाडीवर आहे. यापूर्वीदेखील तिचे असे अनेक व्हिडीओ आदिनाथने शेअर केले असून ते व्हायरल झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 12:25 pm

Web Title: marathi actor adinath kothare share jiza cute video ssj 93
Next Stories
1 डॉ. नेनेंनी खाऊन दाखवली अख्खी हिरवी मिरची, माधुरी दीक्षितला बसला धक्का
2 मिल्खा सिंह यांना पाहून उर्वशी झाली भावूक; आशीर्वाद घेतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल
3 सुशांतचे फेक व्हिडीओ अपलोड करून युट्युबरने कमावले लाखो रुपये
Just Now!
X