News Flash

पियूष रानडे उलडणार नवी कथा; ‘अजुनी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपटात उलगडणार नावीन्यपूर्ण कथा

आजवर मराठी कलाविश्वात काही दिग्दर्शक, निर्माते यांनी नवनवीन विषय हाताळत नव्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती केली. यामध्येच आता संघर्ष यात्रा, शिव्या अशा उत्तम चित्रपटांचं दिग्दर्शन केलेले साकार राऊत पुन्हा एक नवी कथा घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यांचा ‘अजुनी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता पियूष रानडे याची मुख्य भूमिका असलेल्या ‘अजुनी’ या आगामी चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे हे पोस्टर लक्षवेधी ठरत आहे. मावळतीचा सूर्याच्या तेजानं उजळलेलं नभांगण आणि त्यात उभा असलेला तरुण असं अर्थपूर्ण हे पोस्टर आहे. या पोस्टरमधून चित्रपटाच्या कथेच्या अनेक शक्यतांचा अंदाज बांधता येऊ शकतो.


दरम्यान,अर्थ स्टुडिओज आणि सारा मोशन प्रा.लि. निर्मित या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच साकार राऊत यांनी निर्मितीचीही जबाबदारीही स्वीकारली आहे. सध्या या चित्रपटात पियूष रानडे मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं स्पष्ट झालं असलं तरीदेखील अद्याप अन्य भूमिकांवरील पडदा दूर सारण्यात आलेला नाही. त्यामुळे पियूषसोबत या चित्रपटात नेमकी कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 9:00 am

Web Title: marathi actor piyush ranade new movie ajuni coming soon ssj 93
Next Stories
1 Friendship Day 2020 : मैत्रीवर आधारित टॉप ५ बॉलिवूड चित्रपट
2 ..त्याच ‘कुंपणाची’ खरी गोष्ट!
3 ‘भूमिका केवळ अभिनयातून नाही, तर अभ्यासातून घडत जाते’
Just Now!
X