News Flash

“जेव्हा मी काडीपैलवान होते..,” प्राजक्ता माळीने दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा

पाहा व्हिडीओ

छोट्या पडद्यावरिल अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रीं पैकी एक आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत प्राजक्ता चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आता प्राजक्ताने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

प्राजक्ताने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत प्राजक्ता ‘देवदास’ या चित्रपटातील ‘डोला रे डोला’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ तिच्या बालपणीचा आहे. व्हिडीओ नीट दिसत नसला तरी प्राजक्ताच्या बालपणीच्या आठवणी मात्र ताज्या झाल्या आहेत. प्राजक्ताला लहान असल्यापासूनच डान्स आणि अभिनयाची आवड होती. “जेव्हा मी काडीपैलवान होते आणि सीडी बघून हुबेबुब डान्स करण्याचा प्रयत्न करायचे,” असे गंमतीशीर कॅप्शन प्राजक्ताने या व्हिडीओला दिले आहे. प्राजक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

२०११ मध्ये प्राजक्ताने ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. मात्र, तिला खरी प्रसिद्धी ही ‘जुळून येती रेशिम गाठी’ या मालिकेतून मिळाली. या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. या मालिकेत प्राजक्ताने मेघा देसाईची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर प्राजक्ताला ‘खो-खो’, ‘हंपी’ आणि ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यातची संधी मिळाली. सध्या प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी शोचे सुत्रसंचालन करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 12:20 pm

Web Title: marathi actoress prajakta mali shares childhood dancing video on dola re dola re from devdas movie dcp 98
Next Stories
1 ‘मुलगी झाली हो’मधील माऊ आणि सिद्धांतचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
2 ‘अनुष्काकडून काही शिक’, बाळाला सोडून फिरणाऱ्या करीनाला नेटकऱ्यांचा सल्ला
3 93व्या ऑस्कर नामांकनाची घोषणा, प्रियांका निकची धमाल
Just Now!
X