20 September 2020

News Flash

Video : महाराणी येसूबाई ते आर्या; पाहा प्राजक्ता गायकवाडची अनकट मुलाखत

पाहा, प्राजक्ता गायकवाडची संपूर्ण मुलाखत

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. उत्तम अभिनयशैली आणि गोजिरवाणा चेहरा यांच्या जोरावर प्राजक्ता आज विशेष लोकप्रिय आहे. प्राजक्ता सध्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या निमित्ताने तिने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत तिने अनेक गोष्टींवर चर्चा केली. तसंच तिच्या जीवनातील अनेक गोष्टी शेअर केला.

दरम्यान, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तिची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. त्यातच ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत ती आर्या ही भूमिका साकारत असून तिची ही भूमिकादेखील प्रेक्षकांना विशेष आवडत असल्याचं दिसून येत आहे. या मुलाखतीत प्राजक्ताने तिच्या करिअरसोबतच तिच्या कुटुंबाविषयी आणि कॉलेजजीवनातील काही आठवणी शेअर केल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 8:11 am

Web Title: marathi actress prajakta gaikwad special interview on loksatta digital adda uncut video ssj 93
Next Stories
1 प्रसिद्ध अभिनेत्री आशू यांचे निधन
2 जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर आराध्याला ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचे सडेतोड उत्तर
3 करण जोहरच्या घरी ड्रग्स पार्टीचं आयोजन? माजी आमदारानं NCB कडे केली तक्रार
Just Now!
X