16 January 2021

News Flash

‘देव देव्हाऱ्यात नाही’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेता विक्रम गोखले साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

सामाजिक विषयावर भाष्य करणारा 'देव देव्हाऱ्यात नाही'

सध्याच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीत दररोज नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत. अनेक दिग्दर्शक, निर्माते नवी विषय हाताळत आहेत. यात ऐतिहासिक, राजकीय किंवा पौराणिक विषयांवर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती झाल्याचं दिसून येतं. या चित्रपटांच्या मांदियाळीमध्येच आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. नुकताच या आगामी चित्रपटाचा लोगो प्रदर्शित झाला असून यात दिग्गज कलाकार झळकणार आहेत.

प्रवीण बिरजे दिग्दर्शित देव देव्हाऱ्यात नाही असं या आगामी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक मुद्द्यावर भाष्य करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ७ ते ८ महिन्यांच्या प्रदिर्घ कालावधीनंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा हा पहिला चित्रपट ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. नितीन उपाध्याय यांच्या ऑडबॉल मोशन पिक्चरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.

“हा चित्रपट मला अतिशय जवळचा आहे. या चित्रपटाच्या पहिल्याच वाचनाच्या वेळी मी या चित्रपटाला होकार दिला. हा चित्रपट एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर आधारित आहे जो सगळ्यांना अतिशय आपलासा आणि ओळखीचा आहे. त्यामुळे हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा आहे, असं विक्रम गोखले म्हणाले.

दरम्यान, या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, सुहासिनी मुळ्ये, मेघना नायडू व रिना अग्रवाल अशी तगडी स्टारकास्ट झळकणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे २०२१मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 5:12 pm

Web Title: marathi movie dev devharyat nahe coming soon vikram gokhale lead role ssj 93
Next Stories
1 अपूर्वा नेमळेकर म्हणते, ‘रोशन सेटवर…’
2 “आता माझी माफी मागा”; बिहार निवडणूक संपताच शेखर सुमन संतापले
3 …म्हणून ‘सूरज पे मंगल भारी’ पाहण्यासाठी गेलेला आमिर खान होतोय ट्रोल
Just Now!
X