28 September 2020

News Flash

‘या’ व्यक्तीचं नाव घेताच चिन्मयी सुमीतच्या डोळ्यात तरळलं पाणी

चिन्मयीसोबत शुभांगी गोखलेदेखील उपस्थित होत्या

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘दोन स्पेशल’ हा कार्यक्रम सध्या चांगलाच रंगताना पाहायला मिळतोय. अभिनेता जितेंद्र जोशी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे.‘दोन स्पेशल’ या कार्यक्रमात कलाकारांच्या आयुष्यातील जगासमोर न आली गुपिते समोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अभिनयाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून त्यांच्या रोजच्या जगण्यातले अनुभव, त्यांची मते, त्यांचे विचार गप्पांच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या सेटवर अभिनेत्री चिन्मयी सुमीत आणि शुभांगी गोखले हजेरी लावली होती. यावेळ जितेंद्र जोशीने एका व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर पटकन चिन्मयीच्या डोळ्यात पाणी आलं.

‘दोन स्पेशल’च्या सेटवर एक गेम खेळण्यात आला. या गेममध्ये जितेंद्र ज्या व्यक्तीचं नाव घेईल, त्या व्यक्तीने तुम्हाला काय दिलं हे सांगायचं होतं. यावेळी जितेंद्र विनय आपटे यांचं नाव घेतलं. विनय आपटे यांचं नाव घेताच चिन्मयीच्या डोळ्यात पाणी तरळलं.”विनय आपटे यांनी खूप कमी दिलं आणि खूप काही घेऊन गेले. आत्मविश्वास आणि स्वत:कडे बघण्याची वेगळी दृष्टी दिली”, असं चिन्मयी म्हणाली. सोबतच तिने कथा अरुणाची या नाटकातील काही आठवणीही सांगितल्या.

दरम्यान, चिन्मयी आणि शुभांगी यांच्यासोबत हा भाग गुरुवारी रंगणार असून या भागात आणखी काय काय पाहायला मिळणार हे लवकरच समजेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2020 3:40 pm

Web Title: marathi serial don special chinmayee sumeet and shubhangi gokhale ssj 93
Next Stories
1 ‘हा’ ठरला वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेता
2 हार्दिकच्या गर्लफ्रेंडला मेकअपविना ओळखणंही आहे कठीण; पाहा फोटो
3 ‘रुंजी’ फेम पल्लवी पाटीलची ‘अग्निहोत्र २’मध्ये एण्ट्री
Just Now!
X