News Flash

‘लागिरं झालं झी’फेम अभिनेता रमला शेतात

पाहा,या अभिनेत्याचे शेतात काम करतानाचे फोटो

एखाद्या मालिकेचं, चित्रपटाचं चित्रीकरण करणं, डबिंग करणं किंवा फोटोशूट करणं हे कोणत्याही कलाकारांसाठी नवीन राहिलेलं नाही. विशेष म्हणजे बोल्ड, स्टर्निंग असलेलं हेच फोटोशूट नवोदित कलाकारांना त्यांची एक वेगळी ओळख निर्माण करुन देत असतात. त्यामुळे चाहत्यांमध्ये या कलाकारांची लोकप्रिय वाढत असते. मात्र ही लोकप्रियता वाढावी यासाठी बरेचसे कलाकार वेगवेगळ्या थीमनुसार फोटोशूट करत असतात. मात्र ‘लागिरं झालं जी’फेम निखिलने मात्र मातीशी नाळ जोडून ठेवणारं फोटोशूट केलं आहे. निखिलने शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या रुपात नवीन फोटोशूट केलं आहे.

‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून त्याचं देशाप्रती असणारं प्रेम,अभिमान पाहायला मिळालं होतं. मात्र, हा अभिमान मालिकेपुरता मर्यादित न राहता तो त्याच्या खऱ्या आयुष्यातही तितकाच महत्वाचा आहे. याचे दर्शन नेहमीच त्याच्या कृत्यातून घडते आणि म्हणूनच देशाप्रती जीवाचे रान करणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांची किमया आणि महत्त्व पटवून देण्यासाठी निखिलने शेतात उतरून काम करत, शेतकऱ्याचे कपडे परिधान करत एक आगळेवेगळे फोटोशूट केले आहे.

 

वाचा : श्वेता शिंदे आणि देवदत्त नागे यांच्यात खुलणार प्रेम

निखिलच्या चाहत्यांचा या फोटोशूटला किती पाठिंबा मिळतो आणि कितपत त्याचे चाहते खुश होतात हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरेल. छोट्या पडद्यावर झळकलेला निखिल लवकरच चित्रपटांमध्येदेखील झळकणार आहे. विशेष म्हणजे निखिल चार चित्रपटांमध्ये दिसणार असून अद्याप या चित्रपटांची नावं गुलदस्त्यात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 2:25 pm

Web Title: marathi tv showlagira jhala ji fame actor work in farm ssj 93
Next Stories
1 श्वेता शिंदे आणि देवदत्त नागे यांच्यात खुलणार प्रेम
2 करिनासोबत फ्लर्ट करणाऱ्या कपिलला सैफने झापलं; म्हणाला…
3 Video : रणवीरने सहअभिनेत्याला केलं किस
Just Now!
X