09 December 2019

News Flash

Video : पॅकअपनंतरही राधिका सुभेदार म्हणतेय, ‘घर नहीं जाएंगे हम’

पाहा व्हिडीओ...

अनिता दाते

‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सुरू होऊन बरीच वर्ष झाली. या मालिकेनंतर सुरू झालेल्या मालिका सुरू झाल्या आणि संपल्या. तरीही ही मालिका अजून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. मालिकेतील कलाकारांमध्ये मैत्रीचं नातं चांगलंच रुजलं आहे. सेटवरसुद्धा या कलाकारांची धमाल मस्ती सुरू असते. गमतीशीर व्हिडीओ शूट करण्यापासून एकत्र जेवायला जाण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी हे कलाकार एकत्र वेळ घालवतात. नुकतेच हे कलाकार पॅकअपनंतर एका कॅफेमध्ये गेले आणि तिथे एकच कल्ला केला.

यामध्ये राधिका सुभेदारची भूमिका साकारणारी अनिता दाते, शर्मिला राजाराम, निशित राजदा आणि इतर काही कलाकार मिळून पॅकअपनंतर कॅफेमध्ये गेले. अनिताने हा व्हिडीओ शूट केला असून यामध्ये सर्व कलाकार एन्जॉय करताना दिसत आहेत.

आणखी वाचा : कार्तिक-साराचा ‘खुल्लम खुल्ला प्यार’; इन्स्टाग्राम पोस्टवरून दिली कबुली

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत सध्या रंजक वळण आले आहे. राधिका सौमित्रला लग्नासाठी होकार देते. लग्नाची वेळही ठरते. पण हे लग्न थांबण्याची शक्यता वाढते ती गुरूमुळे. यापुढे काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First Published on August 13, 2019 12:38 pm

Web Title: mazhya navryachi bayko here is how anita date and the team have fun post pack up ssv 92
Just Now!
X