News Flash

कंगना रणौतवर टीका केल्यामुळे तापसी झाली ट्रोल, मीम्स व्हायरल

कंगनाने तापसीला 'बी ग्रेड' अभिनेत्री म्हणून सुनावले होते.

सध्या बॉलिवूडमध्ये घराणेशाही हा वाद पेटून उठला आहे. तसेच या मुद्यावरुन तापसी पन्नू आणि कंगाना रणौत यांच्यामध्ये जोरदार वाद सुरु आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कंगनाने तापसीला ‘बी ग्रेड’ अभिनेत्री म्हणून सुनावले होते. त्यावर तापसीने देखील कंगनाला सडेतोड उत्तर दिले. त्या दोघींमधील भांडण पाहून सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले आहेत.

या मीम्समध्ये नेटकऱ्यांनी तापसी पन्नूवर निशाणा साधला आहे.

कंगना आणि तापसीच्या भांडणामध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तापसीला पाठिंबा दिला होता.

काय म्हणाली कंगना?

कंगनाने एका मुलाखतीमध्ये “या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मी फक्त गमावू शकते. कारण मला माहितीये, उद्या ही मूव्ही माफिया गँग बाहेरून आलेल्या तापसी पन्नू, स्वरा भास्कर यांसारख्या २० कलाकारांना समोर आणेल. आणि हे कलाकार फक्त कंगनालाच घराणेशाहीचा त्रास होतो पण आमचं करण जोहरवर प्रेम आहे असं म्हणतील. जर तुम्हाला करण जोहर इतका आवडतो, तर तुम्ही बी ग्रेड अभिनेत्री का आहात? तुम्ही तर आलिया भट्ट आणि अनन्या पांडेपेक्षा चांगले दिसता. तुम्ही चांगल्या अभिनेत्री आहात. तरी तुम्हाला काम का मिळत नाही. तुमचं पूर्ण अस्तित्वच घराणेशाहीचा पुरावा आहे. या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही खूश आहात हे मला का सांगताय? मला माहितीये की भविष्यात असंच होईल आणि संपूर्ण सिस्टम मला वेडं ठरवेल”, असे म्हटले होते.

तापसीचं उत्तर

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तापसीने कंगनाच्या प्रत्येक वक्तव्यावर उत्तर दिलं आहे. “करण जोहर मला आवडतो असं मी कुठेही म्हटलं नाही. त्याचप्रमाणे करण जोहरचा मला राग येतो असंही मी म्हटलं नाही. मी तर त्याला हाय, हॅलो, थँक्य यू संवादाशिवाय ओळखतसुद्धा नाही. माझं अस्तित्व माझ्या दिसण्यावरून आहे असा विचार मी अजिबात करत नाही. मीसुद्धा संघर्ष केलाय पण फक्त त्याची मार्केटिंग कधी केली नाही. गेल्या तीन वर्षांपासून मी दर वर्षी किमान चार चित्रपटांत काम केलंय. नुकतीच माझ्या पाच आगामी चित्रपटांची घोषणा झाली. कोण म्हणतंय की मला काम मिळत नाही? मी कंगनाची साथ देत नाही म्हणून ती आणि तिची बहीण माझ्यावर असले आरोप करतेय” असे तापसीने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 12:44 pm

Web Title: memes on taapsee pannu surface on twitter after she hits back at kangana ranaut avb 95
Next Stories
1 ‘अभिषेकला मिठी मारल्यानंतर क्वारंटाइनमध्ये जाण्यासही तयार’; सहकलाकाराची पोस्ट
2 “दिल बेचारावर टीका करु नका, अन्यथा…”; चेतन भगत यांनी टीकाकारांना दिला इशारा
3 हात जोडून बिग बींनी मानले चाहत्यांचे आभार; म्हणाले…
Just Now!
X