News Flash

#MeToo: अभिनेत्रीचा दावा, साजिद म्हणाला बिकीनी घालून ये आणि…

तुला पाहून मी उत्तेजित होत नाही. मग प्रेक्षक कसे उत्तेजित होतील', असंही साजिदने म्हटल्याचे प्रियंका नमूद करते. साजिदचे ते वर्तून पाहून मी रडतच तिथून निघाले

लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांमुळे साजिद खान अडचणीत आला आहे.

लैंगिक छळाच्या आरोपांमुळे गोत्यात आलेला दिग्दर्शक साजिद खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आणखी एका अभिनेत्रीने साजिद खानवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे. ऑडिशनदरम्यान साजिद खानने मला बिकिनी घालून यायला सांगितले आणि मी जेव्हा बिकीनी घालून आले त्यावेळी साजिद सोफ्यावर अश्लील चाळे करत होता, असा आरोप अभिनेत्री प्रियंका बोसने केला आहे.

अभिनेत्री प्रियंका बोसचा ‘लायन’ हा हॉलीवूडमधील चित्रपट गाजला होता. ऑस्करमध्ये या चित्रपटाला नामांकन मिळाले होते. प्रियंकाने ‘मिस मालिनी.कॉम’ला मुलाखत दिली असून यात तिने साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. साजिद खानने मला ऑडिशनसाठी बोलावले होते. साजिदच्या सहाय्यक दिग्दर्शकाचा मला मेसेज आला होता की बिकीनीमध्ये ऑडिशन द्यावं लागणार आहे. मी ऑडिशनला गेल्यावर बिकीनी घालून आले. साजिद काही वेळाने तिथे आला. तो सोफ्यावर बसला आणि माझ्यासमोरच अश्लील चाळे करु लागला, असा आरोप प्रियंकाने केला. ‘तुला पाहून मी उत्तेजित होत नाही. मग प्रेक्षक कसे उत्तेजित होतील’, असंही साजिदने म्हटल्याचे प्रियंका नमूद करते. साजिदचे ते वर्तून पाहून मी रडतच तिथून निघाले आणि घर गाठले, असे प्रियंकाने सांगितले.

दिग्दर्शक सौमिक सेनवरही प्रियंकाने आरोप केला आहे. सौमिक सेनने मला तुझ्यासोबत विवाहबाह्य संबंध ठेवायचे आहे, असे सांगितल्याचे प्रियंकाने म्हटले आहे.

दरम्यान, साजिद खानवर याअगोदरही लैंगिक छळाचे आरोप झाले होते. करिश्मा उपाध्याय आणि अभिनेत्री सलोनी चोप्रा यांनी साजिदवर आरोप केले होते. या आरोपांमुळे साजिदला हाऊसफुल ४ हा चित्रपट सोडावा लागला होता. अक्षय कुमारनेही साजिद खानसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 11:21 pm

Web Title: metoo actress priyanka bose accused sajid khan during bikini audition
Next Stories
1 शाहरूख, प्रियांका बाहेरून येऊनही यशस्वी! घराणेशाहीवर रवीना टंडनचं मत
2 राजकुमार- नर्गिसचा ‘५ वेडिंग्ज’ प्रेक्षकांच्या भेटीला
3 मलायका-अर्जुन करणार लवकरच नात्याची अधिकृत घोषणा?
Just Now!
X