News Flash

करोनावर मात करण्यासाठी मिलिंदने घेतला ‘हा’ खास काढा, पोस्टद्वारे सांगितली रेसिपी

जाणून घ्या काढा कसा बनवला..

राज्यात करोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वी अभिनेता मिलिंद सोमणची देखील करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. सोशल मीडिया पोस्टद्वारे मिलिंदने याबाबत माहिती दिली होती. आता त्याची करोना चाचणी निगेटीव्ह आल्याचे समोर आले आहे. दरम्यान मिलिंदने क्वारंटाइनच्या काळात घेतलेल्या काढ्याची रेसीपी सांगितली आहे.

मिलिंद सोमणने पत्नी अंकितासोबतचा एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत, ‘करोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे क्वारंटाइनचा काळ संपला. तुम्ही सर्वांनी मी लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना केल्याबद्दल तुमचे आभार. अंकिता तुझे देखील आभार. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह येताच गुवाहाटीवरुन तू येथे आली. तू माझी योग्य ती काळजी घेतली’ असे मिलिंदने म्हटले आहे.

पाहा : ‘या’ मराठी कलाकारांसोबतच त्यांची आई देखील आहे लोकप्रिय अभिनेत्री!

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

आणखी वाचा : ‘रात्रीस खेळ चाले ३’मधील अभिरामची पत्नी आहे तरी कोण?

पुढे करोना काळात कोणता काढा घेतला याबाबत सांगितले आहे. ‘क्वारंटाइनच्या काळात मी कोणता काढा घेतला असे मला अनेकांनी विचारले. त्यांना मी सांगू इच्छितो की कोथिंबीर, मेथीचे दाणे, काळी मिरी, तुळस, आलं आणि गूळ याचा काढा मी घेतला होता. पहिल्या आठवड्यामध्ये मला कोणत्याही गोष्टीचा वास येत नव्हता. या व्यतिरिक्त मला कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐका’ असे मिलिंद पुढे म्हणाला.

काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर, आमिर खान, आर माधवन, विक्रांत मेसी, कार्तिक आर्यन, फातिमा सना शेख, आलिया भट्ट, विकी कौशल, अक्षय कुमार या कलाकारांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 12:25 pm

Web Title: milind soman tests negative for corona share recipe of kadha avb 95
Next Stories
1 इतिहास जिवंत होणार…, शिवरायांच्या शिलेदारांची शौर्यगाथा
2 ही आहे सनी लिओनीच्या नव्या फ्लॅटची किंमत ……आकडा वाचून थक्क व्हाल!
3 “जगाला ज्ञान शिकवणाऱ्या…’, मास्क न घातलेल्या कंगनाला सुयश रायने केलं ट्रोल
Just Now!
X