News Flash

दिलदार सल्लूभाईचं हेच सत्य आहे; अभिनेत्याची सलमानवर टीका

"मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या मोहितला सलमानने मदत का केली नाही?"

अभिनेता कमाल आर खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियाव्दारे तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने अभिनेता मोहित बघेलच्या निधनाचे निमित्त साधून सलमान खानवर निशाणा साधला आहे. दानशूर म्हणून मिरवणाऱ्या सलमानकडे मोहितला मदत करण्यासाठी वेळ नव्हता का? असा सवाल त्याने विचारला आहे.

“मोहितने सलमानच्या ‘रेडी’ आणि ‘जय हो’ या दोन चित्रपटात काम केलं होतं. पण मोहितला श्रद्धांजली देण्यासाठीसुद्धा सलमानकडे वेळ नव्हता. सलमान बिंग ह्युमनचा मुखवटा लावून लोकांची मदत करतोय. खरं तर हे सर्व केवळ प्रसिद्धीसाठीच सुरु आहे.” अशा आशयाचे ट्विट करुन कमाल खानने मोहितला श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता मोहित बघेल याचे निधन झाले आहे. तो केवळ २७ वर्षांचा होता. कर्करोगामुळे त्याचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मोहित लहानपणापासून कर्करोगग्रस्त होता. अखेरच्या काही दिवसांमध्ये तो नोएडा येथील रुग्णालयात उपचार घेत होता. परंतु कर्करोगाचा प्रभाव वाढल्यामुळे त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टर अपयशी ठरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 7:51 pm

Web Title: mohit baghel kamaal r khan salman khan mppg 94
Next Stories
1 मिहिका बद्दल कळताच अशी होती राणाच्या घरातल्यांची प्रतिक्रिया
2 “सलमानला वाटतं सगळेच त्याच्याविरोधात कट रचत आहेत”; हृतिकने केली होती टीका
3 अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णीचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?
Just Now!
X