सध्या कोणताही क्रिकेट सामना चालू नसतानाही धोनीच्या नावाचा बोलबाला असल्याचे चित्र आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन कूल याच्या जीवनावर आधारित ‘एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होणार असून चित्रपटाविषयी लोकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. पण या चित्रपटाविषयी काही गोष्टींबाबत चर्चा केली जात असून त्यामुळे चित्रपटाची चमक थोडी कमी होताना दिसत आहे. ‘एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी धोनीच्या आयुष्यावर चित्रपट तयार करण्याचे अधिकार घेण्यासाठी त्याला ४० कोटी रुपये दिल्याची चर्चा आहे.
टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाचा दिग्दर्शक नीरज पांडे याने सदर वृत्त धुडकावून लावले आहे. नीरज म्हणाला की, कोणताच स्टुडिओ एखाद्या क्रिकेटरच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचे अधिकार घेण्यासाठी इतका पैसा खर्च करणार नाही. या चित्रपटावर ८० कोटींचा खर्च करण्यात आला असून त्याने प्रदर्शनापूर्वीच ६० कोटींची कमाई केलेली आहे. या चित्रपटाला निदान तोटा सहन करावा लागणार नसल्याचे त्यामुळे निश्चित झाले आहे. या चित्रपटाचे निर्माता आणि धोनीचे मॅनेजर असलेले अरुण पांडे हे इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉमसोबत झालेल्या मुलाखतीत म्हणालेले की, मला बॉक्स ऑफिसच्या आकड्यांबाबत अजिबात चिंता वाटत नाही. हा चित्रपट चांगलाच चालेल असा मला विश्वास आहे. पण अरुण यांनी यावेळी चित्रपटाचा कोणताही आर्थिक तपशील दिला नाही.
‘एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या शीर्षकावरूनच हा चित्रपट भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या आयुष्यातील खूप कमी जणांना माहित असलेल्या गोष्टी दाखवेल हे कळते. अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा धोनीची व्यक्तिरेखा चित्रपटात साकारत आहे. ‘एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट येत्या ३० सप्टेंबरला प्रदर्शित होईल. सुशांत व्यतिरिक्त यात अनुपम खेर, भूमिका चावला, दिशा पतनानी आणि कियारा अडवाणी यांच्याही भूमिका आहेत.
#captaincurious #captaincool #MSDhoniTheUntoldStory (Link in the bio)
A photo posted by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput) on
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.