News Flash

‘अजूनही बरसात आहे’, मुक्ता आणि उमेश झळकणार छोट्या पडद्यावर

तब्बल ८ वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

ही मालिका १२ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर सुरु होणार आहे.

सोनी मराठी प्रेक्षकांसाठी नवनवीन मालिकांची मेजवानी सातत्यानी घेऊन येत असते आणि त्यात आता ‘अजूनही बरसात आहे’ या नव्या मालिकेची भर पडली आहे. चित्रपटसृष्टीतले लाडके चेहरे अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता उमेश कामत या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘डबल सीट’, ‘जोगवा’ या आणि अशा अनेक दर्जेदार चित्रपटांद्वारे, सहजसुंदर अभिनयामुळे मुक्ता बर्वे महाराष्ट्राच्या घराघरांत पोचली. उमेश कामत हा तर तरुणींच्या गळ्यातला ताईतच. त्यानीही ‘टाईम प्लिज’, ‘लग्न पाहावे करून’ अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

आणखी वाचा : ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिका वादाच्या भोवऱ्यात, त्या दृश्या विरोधात तक्रार

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

चित्रपटांबरोबरच नाटक माध्यमातूनही उमेश आणि मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मुक्ता आणि उमेश यांनी लग्न पाहावे करून या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. तब्बल ८ वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

एवढंच नाही तर उमेश सात वर्षांनंतर छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. मालिकेच्या नावातून आणि जाहिरात पाहून ही एक प्रेमकथा आहे असं वाटतंय. थोडी खुसखुशीत आणि अनेक रंगांनी भरलेली मीरा आणि आदी यांची ही प्रेमकथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल! ही मालिका १२ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर सुरु होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 12:52 pm

Web Title: mukta barve and umesh kamat upcoming serial ajunhi barsat aahe coming soon avb 95
Next Stories
1 करोना आणि रामदेव बाबा सारखेच; राखी सावंतने केली तुलना
2 लॉकडाउनमध्ये झाला बेरोजगार; अभिनेत्यानं खर्चासाठी विकली २२ लाखांची बाईक
3 Birthday Special : असा सुरु झाला सोनम कपूरचा बॉलिवूड प्रवास
Just Now!
X