मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वेने लोकसत्ताच्या ‘सहज बोलता बोलता’ या वेब संवादाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. दरम्यान तिला इंडस्ट्रीमधील गटबाजीवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने “आपले प्रेक्षक हे सुजाण तर आहेतच पण रोखठोक देखील आहेत. तुम्ही चांगलं काम करत असाल तर इंडस्ट्रीमध्ये टिकून राहता. प्रेक्षक तुमच्यावर प्रेम करतात, तुमचं काम बघायला येतात. नाहीतर तर ते तुमचं काम पाहात नाहीत” म्हटले.
त्यापूर्वी तिने इतर भाषांमध्ये आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करायाला आवडले अशी इच्छा व्यक्त केली होती. तसेच तिने अभिनयाचे धडे कुठून घेतेले, तिला पहिली मालिका कशी मिळाली, तसेच ‘सखाराम बाइंडर’ या गाजलेल्या नाटकाचे केवळ पाच प्रयोग का केले अशा अनेक गोष्टींचा खुलासा मुलाखतीमध्ये केला आहे.