05 March 2021

News Flash

Ek thi begum : ‘उस बादशाह को मात ये बेगम देगी’; ट्रेलर प्रदर्शित

दाऊद इब्राहिमचा जीव घेण्याचं स्वप्न ज्या महिलेने उराशी बाळगलं ती महिला म्हणजे सपना

एक थी बेगम

सध्याचा काळ हा वेबसीरिजचा असल्याचं म्हटलं जातं. वेबसीरिजच्या माध्यमातून कोणताही विषय अगदी सहज-सोप्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातो. त्यामुळे सध्या वेबसीरिज पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल जास्त आहे. विशेष म्हणजे नेटफ्लिक्स, अँमेझॉन प्राईम, ‘एमएक्स प्लेअर’ अशा कितीतरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर्जेदार वेबसीरिज उपलब्ध आहेत. यामध्येच बऱ्याच वेळा ‘एमएक्स प्लेअर’ दर्जेदार वेबसीरिज असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे लवकरच एमएक्स प्लेअरवर ‘एक थी बेगम’ ही नवीन सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘एक थी बेगम’ ही सीरिज सत्यघटनेवरुन प्रेरित असून यातून अश्रफ भाटकर अर्थात सपनाचा जीवन प्रवास उलगडण्यात येणार आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा जीव घेण्याचं स्वप्न ज्या महिलेने उराशी बाळगलं ती महिला म्हणजे सपना. या सीरिजमध्ये अभिनेत्री अनुजा साठे, सपनाची भूमिका साकारत असल्याचं दिसून येतं आहे.प्रदर्शित झालेल्या ट्रेलरवरुन सपनाने दाऊद इब्राहिमला जीवे मारण्याचा निर्धार का केला यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

‘एक थी बेगम’ ही सीरिज सत्यघटनेवर आधारित असून प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये १९८६ चा काळ दाखविण्यात आला आहे. त्याकाळी सपनचा पती, जहीर हा कुख्यात डॉन दाऊन इब्राहिमच्या जवळचा व्यक्ती मानला जायचा. मात्र सपना आई आणि जहीर बाबा होणार असल्याचं त्याला समजतं, त्यावेळी तो दाऊदची साथ सोडण्याचा निर्धार करतो. ही माहिती दाऊदला समजल्यावर तो जहीरला  एका प्रकरणात अडकतो, ज्यामुळे पोलीस त्याच्या मागावर लागतात आणि याचवेळी जहीरचा मृत्यू होतो. जहीरच्या अचानक जाण्यामुळे सपनाला धक्का बसतो आणि यातच तिचं बाळही जातं. त्यामुळे ज्या दाऊदमुळे आपला नवरा आणि बाळं गेलं, त्याचा सूड घेण्याचा निर्धार सपना करते आणि त्यानुसार डाव आखते.

दरम्यान, या सीरिजमध्ये दमदार संवादांचा भरणा करण्यात आल्याचं ट्रेलरवरुन दिसून येतं. आहे. तसंच अनुजा साठे या अभिनेत्रीनेही सपना या भूमिकेला न्याय दिल्याचं दिसून येतं आहे. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये अनेक मराठी चेहरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सध्या तरी या ट्रेलरमधून अभिनेता चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर,अभिजीत चव्हाण, अनिल नागरेकर, सुचित जाधव ही कलाकार मंडळी पाहायला मिळाली. ही सीरिज हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 3:00 pm

Web Title: mxplayer new webseries sapna didi trailer out actress anuja sathe lead role ssj 93
Next Stories
1 ‘सोनाक्षीसारख्या लोकांनी ‘रामायण’ पाहावं’; मुकेश खन्नांचा ‘दबंग गर्ल’ला टोमणा
2 ‘यांच्या हातातून फोन काढून घ्या’; चुकीचा फोटो शेअर केल्यामुळे बिग बी ट्रोल
3 Lockdown : हातावर पोट भरणाऱ्यांना ‘नेटफ्लिक्स’नं केली मदत
Just Now!
X