28 September 2020

News Flash

‘केबीसी’मध्ये लाखो रुपये जिंकूनही नागपूरचा मुलगा परतला रिकाम्या हातीच

बालदिनानिमित्त 'केबीसी'मध्ये लहान मुलांसाठी विशेष भाग शूट करण्यात आला होता.

'कौन बनेगा करोडपती'

अमिताभ बच्चन यांचा सर्वांत लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’चा दहावा सिझन सध्या सुरू आहे. ‘केबीसी’च्या या पर्वात लहान मुलांनीही सहभाग घेतला आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर पैसे जिंकण्याची संधी देणाऱ्या या शोमध्ये येण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. किंबहुना हे स्वप्न अनेकांनी आजवर पूर्ण केली आहेत. पण केबीसीच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाला लाखो रुपये जिंकूनही रिकाम्या हाती परतावे लागले आहे.

बालदिनानिमित्त ‘केबीसी’मध्ये लहान मुलांसाठी विशेष भाग शूट करण्यात आला होता. या भागात नागपूरच्या ११ वर्षीय तुषित निकोसेला हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली. सहावीत शिकणाऱ्या तुषितने अत्यंत हुशारीने हा खेळ खेळण्यास सुरुवात केली. एकेका प्रश्नाची उत्तरं देत तो १२ व्या प्रश्नापर्यंत पोहोचला. तोपर्यंत त्याच्या सर्व ‘लाइफलाइन’ संपल्या होत्या. ‘ऑलिम्पिकमध्ये २३ सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्य पदक पटकावलेला खेळाडू कोणता?’ असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर माहीत नसल्याने तुषितने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.

वाचा : या तेलुगू रिमेकमधून सुनील शेट्टीचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

१२ प्रश्नांमध्ये तुषितने सहा लाख चाळीस हजार रुपयांची रक्कम जिंकली होती. पण अल्पवयीन असल्याने जिंकलेली ही रक्कम तो घरी घेऊन जाऊ शकला नाही. तुषित १८ वर्षांचा झाल्यानंतर त्याला ही रक्कम मिळेल असं बिग बींनी कार्यक्रमात सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2018 12:59 pm

Web Title: nagpur boy tushit nikose won 6 lakh rupees in kbc but can not take it home
Next Stories
1 अवघ्या काही तासांत जगासमोर येणार दीप-वीरच्या लग्नाचा पहिला फोटो
2 #DeepVeerKiShaadi : विवाहसोहळ्याच्या सुरक्षेसाठी केलेला खर्च ऐकून थक्क व्हाल
3 ‘ड्युरेक्स’कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा
Just Now!
X