छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता नकुल मेहता आणि त्याची पत्नी जानकी काही महिन्यांपूर्वीच आई-बाब झाले आहेत. नकुल आणि जानकीला मुलगा झाला असून त्यांनी त्याचं नाव सूफी ठेवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांनी नकुलकडे मुलाचा फोटो शेअर करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर चाहत्यांच्या इच्छेखारत नकुलने मुलगा सूफीचा एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
नकुलचा मुलगा सूफी आता सात महिन्यांचा झाला आहे. नुकताच नकुलने सूफीचा एक व्हि़डीओ शेअर केलाय. चिमुकल्या सूफीच्या क्यूटनेसवर नेटकऱ्यांसोबत अनेक सेलिब्रिटी फिदा झाले आहेत. अनेकांनी तर सूफी तैमूर पेक्षा क्यूट दिसत असल्याचं म्हंटलं आहे. सूफीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. सूफीचे निळे डोळे आणि सोनेरी केस नेटकऱ्याचं लक्ष वेधून घेत आहेत. या व्हिडीओवर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडतोय.
View this post on Instagram
नकुलने शेअर केलेल्या त्याच्या मुलाच्या व्हिडीओवर छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी कमेंट करत लहानग्या सूफीचं कौतुक केलंय. तर अनेकांनी सूफी नकुल सारखाचं दिसत असल्याचं म्हंटलं आहे.
View this post on Instagram
नीति मोहन, जेनिफर विंगेट यांसह अनेक कलाकारांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. नीति मोहनने कमेंट मध्ये म्हंटलं, ” अखेर या क्यूट मुलाला पाहिलंच. हा किती सुंदर आहे. त्याच्या डोळ्यांबद्दल तर काय म्हणावं. माझे आशिर्वाद सदैव त्याच्यासोबत आहेत.”
काही महिन्यांपूर्वीच नकुलने मुलाचं नाव सूफी ठेवल्याचं सांगितलं होतं. जानकी गरोदर असतानाच त्यांना हे नाव सुचलं होतं.