News Flash

‘नटसम्राट’मध्ये नाना पाटेकर

मराठी रंगभूमीवर आपल्या कथाआशयाने अजरामर ठरलेले नटसम्राट हे नाटक आता मराठी चित्रपटाच्या रूपातही आपल्यासमोर येणार आहे.

| February 1, 2015 02:24 am

मराठी रंगभूमीवर आपल्या कथाआशयाने अजरामर ठरलेले नटसम्राट हे नाटक आता मराठी चित्रपटाच्या रूपातही आपल्यासमोर येणार आहे. मार्च महिन्यातच या अनोख्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार असून त्यामध्ये नाना पाटेकर, रीमा यांच्या प्रमुख भूमिका आहेत, असे रीमा यांनी एका जाहीर मुलाखतीत सांगितले.
या वेळी रीमा यांनी आपले गिरगावातील बालपण, तिथे साजरे होणारे अनेक प्रकारचे सण, कोपऱ्यावरचे कोना हॉटेल, कुलकण्र्याकडची भजी, मॅजेस्टिक, सेंट्रल अशा चित्रपटगृहांत साठच्या दशकात पाहिलेले मराठी चित्रपट अशा अनेक आठवणींना उजाळा दिला.  
आपल्याला संपूर्ण ५० वर्षांपेक्षा अधिक जास्त कारकीर्दीत अनेक शैलींच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. तरी राज कपूर, व्ही. शांताराम, सुभाष घई यांच्या दिग्दर्शनाखाली संधी न मिळाल्याची खंत आजही वाटते. ‘हीना’ चित्रपटात आपण भूमिका साकारली त्या चित्रपटाची दोन गीते राज कपूर यांच्या हयातीतच ध्वनिमुद्रित झाली होती, अशीही आठवण रीमा यांनी सांगितली. बेबी नयन अशी आपण बालकलाकार म्हणून वाटचाल सुरू केली. त्या प्रवासात गिरगावचे संस्कार, घरातील वातावरण, उत्तमोत्तम साहित्य वाचन, चांगली नाटकं व चित्रपट पाहणे अशा गोष्टींचा खूपच मोठा वाटा आहे, असेही त्या म्हणाल्या.
हिंदी चित्रपटांच्या वाटचालीत गोविंदा हा काम करण्यासाठी अत्यंत अवघड असा कलाकार ठरला. कारण तो कायम सेटवर उशिरा यायचा. याउलट नसीरुद्दीन शाह, अनुपम खेर, सलमान खान, देव आनंद अशी मंडळी सेटवरचे वातावरण हलकेफुलके ठेवत. देव आनंद यांचा सेटवरचा एकूणच उत्साह पाहून आपण कुठे कमी तर पडत नाही ना, असे आपल्याला उगाचच वाटे, असेही हसत हसत रीमा यांनी सांगितले. नवीन कलाकार घडविण्यासाठी आपण लवकरच वर्कशॉप घेणार आहोत, त्यामुळे नवीन पिढीशी आपला संवाद साधला जाईल, असेही रीमा यांनी मुलाखतीत शेवटी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2015 2:24 am

Web Title: nana patekar in natsamrat
टॅग : Nana Patekar
Next Stories
1 जादा ‘फिल्मी’
2 ‘गर्दिश में तारे’
3 जॅकलिनच्या चित्रकलेला सलमानची प्रेरणा
Just Now!
X