News Flash

४० वर्ष वाट पाहिल्यानंतर अखेर नीना गुप्ता यांना बिग बींसोबत काम करण्याची संधी मिळाली !

'गुडबाय' सिनेमात नीना गुप्ता या बिग बी अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहेत

(File Photo/ Neena Gupta/Amitabh Bachachan)

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या गेल्या काही दिवसांपासून त्यांचं आत्मचरित्र ‘सच कहूं तो’ मुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. या पुस्तकात त्यांनी अनेक खासगी गोष्टींचा खुसाला केलाय. १४ जूनाला हे पुस्तक प्रकाशित झालंय. या पुस्तकाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने नीना गुप्ता चांगल्याचं आनंदात आहेत. मात्र सध्या त्यांचा आनंद द्विगुणीत झालाय. याचं कारणं म्हणजे नीना गुप्ता पहिल्यांदा बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणार आहेत.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी त्यांना झालेला आनंद व्यक्त केलाय. नीना गुप्ता यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये दमदार अभिनय केलाय. मात्र त्यांच्या ४० वर्षांच्या करिअरमध्ये त्या पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. त्या म्हणाल्या, “लोकांना हे जाणून कदाचित आश्चर्य वाटेल पण ‘गुडबाय’ हा असा सिनेमा आहे ज्यात पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळतेय या गोष्टीचा मला आनंद आहे.”असं त्या म्हणाल्या.

हे देखील वाचा: ‘तारक मेहता…’मधील भिडे मास्तरांच्या सोनूचा व्हिडीओ व्हायरल, समुद्र किनारी निधि भानुशालीची धमाल

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

हे देखील वाचा: “मी आता लिपस्किट पण नाही लावली”, म्हणत किरण खेर यांनी कॅमेरासमोर येण्यास दिला नकार

पुढे त्या म्हणाल्या, “गेली अनेक वर्ष आम्ही एका प्रोजेक्टवर चर्चा करत होतो. मात्र तो पूर्णत्वास आला नाही”. पुढे नीना गुप्ता यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करतावाचा अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, “अमिताभ यांच्यासोबत चांगलं नातं आहे. मात्र जेव्हा त्यांच्या सोबत अभिनय करण्याची वेळ येते तेव्हा भीती वाटते. सुरुवातीला मी सेटवर खूप नर्वस होते. खरं सांगू तर त्यांच्या समोर अभिनय करताना एक दडपण होतं. मात्र नंतर काही काळाने आम्ही सेटवर खूप गप्पा मारू लागलो. आता सर्व सुरळीत आहे.” असं नीना गुप्ता म्हणाल्या.

नीना गुप्ता नुकत्याच उत्तराखंडमधील त्यांच्या घरी दोन महिन्यांची सुट्टी एन्जॉय करून मुंबईत परतल्या आहेत. मुंबईत येताच त्यांनी ‘गुडबाय’ या सिनेमाच्या शूटिंगला देखील सुरुवात केलीय. करोनाचं संकट आणि लॉकडाउनमुळे या सिनेमाचं शूटिंग रखडलं होतं. या सिनेमाचं दिग्दर्शक विकास बहल करत आहेत. तर या सिनेमात नीना गुप्ता या बिग बी अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 12:57 pm

Web Title: neena gupa sharing screen with big b amitabh bachchan in goodbye flim first time in 40 year career kpw 89
Next Stories
1 मुलगा रणबीरच्या ‘गलती से मिस्टेक’ गाण्यावर नीतू कपूरचा धमाकेदार डान्स; व्हिडीओ होतोय व्हायरल
2 ‘तारक मेहता…’मधील भिडे मास्तरांच्या सोनूचा व्हिडीओ व्हायरल, समुद्र किनारी निधि भानुशालीची धमाल
3 RD Burman Birth Anniversary: प्ले लिस्टमध्ये असलीच पाहिजेत अशी पंचमदा यांची ही १० सदाबहार गाणी
Just Now!
X