25 January 2021

News Flash

“विवाहित पुरुषाच्या प्रेमात कधीच पडू नका”; नीना गुप्ता यांचा चाहत्यांना सल्ला

मला त्याचे परिणाम भोगावे लागले असं त्या म्हणाल्या.

नीना गुप्ता

‘बधाई हो’ फेम अभिनेत्री नीना गुप्ता यांनी चाहत्यांना एक सल्ला दिला आहे. विवाहित पुरुषाच्या प्रेमात कधीच पडू नका, मी पडले आणि त्याचे परिणामसुद्धा मला भोगावे लागले, असं त्यांनी म्हटलंय. इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी सविस्तरपणे यामागील कारण सांगितलं आहे.

“तो तुम्हाला म्हणतो की त्याला त्याची पत्नी नाही आवडत, त्यांच्यात फार वाद होत आहेत. तो विवाहित असूनदेखील तुम्ही त्याच्या प्रेमात पडता. तू घटस्फोट का नाही घेत असं तुम्ही त्याला विचारता, मग तो तुम्हाला मुलं किंवा इतर कारणं देतो. तुम्ही मग लपूनछपून एकमेकांना भेटू लागता, एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेऊ लागता. हळूहळू तुम्ही एकमेकांसोबत रात्रही घालवता. त्या गोष्टी तुम्हाला हव्याहव्याशा वाटतात आणि मग तुम्ही त्याच्यासोबत लग्न करण्याचा विचार करता. लग्नाबद्दल विचारता तेव्हा तो तुम्हाला पुन्हा कारणं देतो की हे सगळं इतकं सोपं नाही वगैरे वगैरे. हे सगळं ऐकून तुमची चिडचिड होऊ लागते, तुम्ही घाबरू लागता. त्याच्या पत्नीला खरंखोटं सांगण्याचाही विचार तुमच्या मनात डोकावतो. अखेर या सगळ्या गुंतागुंतीमुळे तो तुम्हाला सोडून निघून जातो. तेव्हा तुम्ही काय कराल?”, असं नीना गुप्ता या व्हिडीओत सांगतात.

 

View this post on Instagram

 

#sachkahoontoe

A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on

या व्हिडीओच्या अखेरीस त्या चाहत्यांना सल्ला देतात, की कधीच विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडू नका. मीसुद्धा हेच केलंय आणि त्याचे परिणामसुद्धा भोगले आहेत. त्यामुळे तुम्हाला हे सांगतेय की असं करण्याचा प्रयत्न करू नका.

नीना गुप्ता या एकल माता आहेत. वेस्ट इंडिजच्या संघातील माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांना मसाबा ही मुलगी आहे. मसाबा गुप्ता प्रसिद्ध फॅशन डिझायनर असून या मायलेकी विवियन रिचर्ड्ससोबत राहत नाहीत. रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांच्या रिलेशनशिपने ८० च्या दशकापासूनच अनेकांचं लक्ष वेधलं होतं. त्या दोघांनी लग्न केलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 10:54 am

Web Title: neena gupta asks her fans not to fall in love with married men says i have suffered ssv 92
Next Stories
1 Video : ट्रॅफिक आणि ‘मन फकिरा’ची कथा असं आहे यांचं खास कनेक्शन
2 ‘नटसम्राट श्रीराम लागू’ नावाने दिला जाणार पुरस्कार, सरकारची घोषणा
3 २५ वर्षांनी अक्षय कुमारचा ‘तो’ हेलिकॉप्टर स्टंट; बघा आणि फरक ओळखा
Just Now!
X