News Flash

हॉट फोटोंवर येणाऱ्या कमेंटविषयी नीना गुप्ता म्हणतात…

नीना अनेक वेळा त्यांचे मॉर्डन आणि फॅशनेबल लूकमधील फोटो शेअर करतात

नीना गुप्ता

बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वात आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मनं जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असतात. ‘मुल्क’, ‘बधाई हो’ या चित्रपटामध्ये त्यांनी सशक्त भूमिका साकारुन चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे सध्या त्यांचा फॅनफॉलोअर्स चांगलाच वाढला आहे. नीना अनेक वेळा त्यांचे मॉर्डन आणि फॅशनेबल लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करतात. सहाजिकच, त्यांनी असे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया येते. त्यातच त्यांनी हॉट फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांची नेमकी प्रतिक्रिया काय असते हे त्यांनी सांगितलं आहे.

नीना यांनी हॉट फोटो शेअर केल्यानंतर त्या चित्रपटामध्ये तरुण भूमिका मिळविण्यासाठी हा प्रयत्न करत असल्याचं काही जणांचं मत आहे. मात्र यावर नीना यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्टीकरण दिलं आहे. “चित्रपटांमध्ये तरुणींची भूमिका मिळावी यासाठी मी फॅशनेबल किंवा पाश्चात्य कपडे परिधान करत नाही. मला वेगवेगळ्या फॅशन ट्राय करायला आवडतात. त्यामुळे फॅशनच्या बाबतीत मी नवनवीन प्रयोग करुन पाहत असते”, असं नीना यांनी सांगितलं.

पुढे त्या म्हणतात, “ज्यावेळी मी साध्या वेशातले फोटो शेअर करते त्यावेळी त्याच्यावर कमी लाईक्स येतात. मात्र हॉट फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून सर्वाधिक लाईक्स आणि कमेंट येतात. या कमेंटमध्ये संमिश्र प्रतिक्रिया असतात. विशेष म्हणजे यात नकारात्मक कमेंट फार कमी असतात”.

दरम्यान, ‘खलनायक’, ‘जाने भी दो यारों’, ‘कमजोर कडी’ आणि ‘गांधी’ यांसारखा चित्रपटांमध्ये नीना यांचा दमदार अभिनय पाहायला मिळालं. त्याचबरोबर ‘सांस’ आणि ‘बुनियाद’ या मालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे २०१८ मध्ये नीना या ‘बधाई हो’, ‘वीरे दि वेडिंग’ आणि ‘मुल्क’ या चित्रपटात दिसल्या होत्या. त्यानंतर आता त्या लवकरच ‘पंगा’, ‘सुर्यवंशी’, ‘म्युझिक टीचर’, ‘ग्वाल्हेर’ यांसारख्या चित्रपटातही दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 2:03 pm

Web Title: neena gupta on her instagram photos ssj 93
Next Stories
1 केतकी चितळेला अश्लील भाषेत ट्रोल केल्याप्रकरणी एक जण अटकेत
2 सुष्मिता- रोहमनच्या नात्यात का रे दुरावा ?
3 तुषारसोबत भांडण झाल्यानंतर एकता कपूरने थेट पोलिसांना लावला फोन
Just Now!
X