News Flash

मुलगा रणबीरच्या ‘गलती से मिस्टेक’ गाण्यावर नीतू कपूरचा धमाकेदार डान्स; व्हिडीओ होतोय व्हायरल

‘सुपर डान्सर 4' मध्ये यंदाच्या एपिसोडमध्ये अभिनेत्री नीतू कपूर गेस्ट जज बनून एन्ट्री करणार आहेत. या शोच्या सेटवरील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

(Source: Express archive photo)

गेल्या काही दिवसांपासून सोनी टीव्हीवर सुरू होणारा रिअ‍ॅलिटी शो ‘सुपर डान्सर 4′ प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन येतोय. यंदा यावेळी सर्व स्पर्धक एकापेक्षा एक परफॉरमन्स देताना दिसतील. या स्पर्धकांचा परफॉर्मन्स पाहून परिक्षक देखील आश्चर्यचकित होणार आहेत. या शोमध्ये फिल्ममेकर अनुराग बासु, बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि कोरिओग्राफर गीता कपूर हे सर्वजण परिक्षकाच्या खूर्चीत बसून स्पर्धकांचं परिक्षण करणार आहेत. तसंच हे तिघे एकमेकांसोबत धमाल मस्ती करणाता सुद्धा दिसणार आहेत. यंदाच्या एपिसोडमध्ये ७० ते ८० दशकातील काळ गाजवणारी अभिनेत्री नीतू कपूर गेस्ट जज बनून एन्ट्री करणार आहेत. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. तसंच या व्हिडीओला लोकांकडून मोठी पसंती मिळत आहे.

सोनी टीव्हीने त्यांच्या ऑफिशिअलच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री नीतू कपूर म्हणतात, “ज्या ज्या वेळी या शोमध्ये कुणी पाहूणे येतात, त्या त्या वेळी त्यांच्यासोबत दादा (अनुराग बासु) डान्स करतात. मला दादांचा रिदम खूप आवडतो. मला माझ्या मुलाच्या एका गाण्यावर दादांसोबत डान्स करायचाय.” अभिनेत्री नीतू कपुरने केलेल्या विनंतीनंतर अनुराग बासु स्टेजवर येतात आणि दोघेही रणबीर कपूरच्या ‘गलती से मिस्टेक’ या गाण्यावर धमाकेदार डान्स करतात. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओवर युजर्स कमेंट्सचा वर्षाव करत असून मोठ्या प्रमाणात लाइक्स दिले आहेत. ज्या संख्येने या व्हिडीओला लाइक्स मिळत आहेत, त्यावरून येणारा एपिसोड पाहण्यासाठी लोकांची किती उत्कुता असेल, याचा अंदाज येतोय. या व्हिडीओला आतापर्यंत ३९ हजारपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.  “या वयात नीतू कपूर इतक्या कमाल आहेत”, अशी कमेंट एका युजरने दिलीय. तर आणखी एका युजरने “स्वीट नीतू कपूर” यांचं कौतुक केलं. अशा प्रकारे प्रेक्षक या शोमधला येणाऱ्या पुढच्या एपिसोडसाठी बरेच उत्सुक झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 12:23 pm

Web Title: neetu kapoor grooves to the beats of ranbir kapoors song galti se mistake super dancer chapter 4 video viral prp 93
Next Stories
1 ‘तारक मेहता…’मधील भिडे मास्तरांच्या सोनूचा व्हिडीओ व्हायरल, समुद्र किनारी निधि भानुशालीची धमाल
2 RD Burman Birth Anniversary: प्ले लिस्टमध्ये असलीच पाहिजेत अशी पंचमदा यांची ही १० सदाबहार गाणी
3 “मी आता लिपस्किट पण नाही लावली”, म्हणत किरण खेर यांनी कॅमेरासमोर येण्यास दिला नकार
Just Now!
X