News Flash

‘तुझा स्तनपानाचा व्हिडीओ शेअर करशील का?”; नेहा धुपियाने ‘तो’ फोटो शेअर करत दिलं उत्तर

"अशा लोकांमुळे मातांना..."

अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना नेहा अनेकदा सडेतोड उत्तर देते. नुकतच एका युजरने नेहाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. एक पोस्ट शेअर करत नेहाने या युजरची बोलती बंद केली आहे. एवढंच नव्हे तर नेहाला ट्रोल करणाऱ्याला नेहाच्या काही चाहत्यांनी देखील सडेतोड उत्तर दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी नेहाने तिच्या मुलीला ब्रेस्टफीडिंग करतानाचा म्हणजेच स्तनपान करतानाचा फोटो शेअर केला होता. यावर एका युजरने अत्यंत वाईट कमेंट केली. “तुम्ही तुमचा ब्रेस्टफीडिंगचा व्हिडीओ शेअर करू शकता का? नम्र विनंती आहे.” युजरने केलेल्या या कमेंटचा स्क्रीनशॉट नेहाने शेअर केला आहे. सोबतच तिने बाळाला स्कतपान करतानाचा एक फोटो देखील शेअर केला आहे. यात नेहा म्हणाली, “मी सहसा अशा कमेंट डिलीट करते किंवा दूर्लक्ष करते. पण मुद्दाम मी ती समोर आणतेय. अशा व्यक्तींमुळे ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या मातांना लाजीरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

हा फोटो शेअर करत नेहाने कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे, ” नव्या आईचा प्रवास असा असतो की तो फक्त तिच समजू शकते. आपण फक्त आनंद पाहतो. पण दुसरीकडे खूप जबाबदाऱ्या आणि विविध भावनांनी पूर्ण स्थिती असते. आई होणं खूप कठीण असून ती फक्त तिला जे करणं गरजेचं आहे तेच करत असते. तिच्यावर प्रश्न उपस्थित करून तिला ट्रोल करू नये. मी या सर्वातून गेलेय.” असं नेहा म्हणाली आहे.

पुढे नेहा म्हणाली, ” हे प्रत्येक आईवर आहे की ती बाळाला कसं स्तनपान किंवा फीड करू इच्छिते. आपण कायम पाहिलं आहे की अनेक जण आईच्या ब्रेस्टफीडिंगकडे सेक्शुअली पाहतात. आम्हाला ब्रेस्टफीडिंगला सामान्य बनवायचं आहे. आपल्या देशात महिलांना अनेकदा अशा समस्यांचा सामना करवा लागतो. ही कमेंट त्याचं उदाहण आहे.” असं ती म्हणाली.

दरम्यान नेहाला ट्रोल करणाऱ्याला नेहाच्या एका चाहतीनेदेखील फटकारलं आहे. ” तुझ्या पेजवर तुझ्या आईचे आणि आजीचे फोटो पाहिले. कृपा करून त्यांना विचार.त्या दाखवतील तुला.” अशी कमेंट नेहाच्या चाहतीने केलीय. तर नेहाने देखील या चाहतीचे आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 12:27 pm

Web Title: neha dhupia shares her brestfeeding photo to answer who troll her share brestfeeding video kpw 89
Next Stories
1 ट्रोलर्सला उत्तर देताना फरहान अख्तर म्हणाला, ” घरीच राहा आणि तोंडं धुवा”
2 ट्विटरनंतर इन्स्टाग्रामवर कंगनाची टीका; ” जिहादींचा ताबा….पुढील निवडणुकीत भाजपला धोका”
3 “इरफान सरांनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला होता”, कंगनाचा खुलासा
Just Now!
X