बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका नेहा कक्कर तिच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या तिचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती आपल्या सहकलाकाराची धुलाई करताना दिसत आहे.
नेहाने काही तासांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ तिच्या आगामी म्यूझिक अल्बममधील गाण्याचा आहे. गाण्याचे चित्रीकरण सुरु असताना नेहा आपल्या सहकाऱ्याला मारण्यासाठी त्याच्या मागे पळत आहे. व तिचे सहकारी तिला प्रोत्साहन देत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अर्थात हा व्हिडीओ तिने गंमत म्हणून अपलोड केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
याआधी नेहा तिच्या ‘पूछदा ही नहीं’ (Puchda Hi Nahin) या गाण्यामुळे चर्चेत होती. हे गाणे प्रेक्षकांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाले. आतापर्यंत ८७ लाखांपेक्षा अधिक वेळा हे गाणे युट्यूबवर पाहिले गेले आहे.