02 March 2021

News Flash

जुन्या अंजली भाभीने व्यक्त केली पुन्हा ‘तारक मेहता’मध्ये काम करण्याची इच्छा, पण निर्माते म्हणाले..

सध्या मालिकेत सुनैना फौजदार अंजली भाभीची भूमिका साकारत आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ काही दिवसांपूर्वी मालिकेत अजंली भाभी हे पात्र साकारणारी अभिनेत्री नेहा मेहताने मालिका सोडली. पण आता तिने पुन्हा मालिकेमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र मालिकेच्या निर्मात्यांनी तिला सुनावले आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी या संदर्भात वक्तव्य केले आहे. ‘नेहाने मालिकेत पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण आता फार उशिर झालाय. आम्ही मालिकेत ज्या नव्या अभिनेत्रीला घेतले आहे तिचे काम खूप चांगले आहे. आता नेहाला पुन्हा मालिकेत आणणे शक्य नाही. एकदा कालाकाराची निवड केल्यानंतर त्याला काढता येत नाही’ असे असित यांनी म्हटले आहे.

गेल्या १२ वर्षांपासून नेहा मेहता मालिकामध्ये काम करत आहे. पण तिने अचानक मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने मालिका सोडण्यामागचे कारण सांगितले होते. ‘मी असित मोदी यांचा सम्मान करते. मी त्यांना म्हणाले आपण सर्व गोष्टींवर बोलायला हवे. पण त्यावेळी तुम्हाला कोणी असे म्हणत असेल की, तुम्हाला तुमचा इगो सांभाळायला हवा. तुम्हाला मालिका सोडून जायचे असेल तर जाऊ शकता. आमच्याकडे या भूमिकेसाठी दुसरी कोणती तरी अभिनेत्री आहे. ती मालिकेच्या भूमिकेसाठी कमी मानधन घेणार आहे. हे कोणासोबतही घडू शकते. त्यामुळे मी आता या गोष्टीचा फार विचार केला नाही’ असे म्हटले होते.

आता मालिकेमध्ये अंजली भाभीची भूमिका अभिनेत्री सुनैना फौजदार निभावत आहे. तिने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 8:28 pm

Web Title: neha mehta wanted to return in tarak mehata ka oolta chashma avb 95
Next Stories
1 डिस्लाइकच्या भीतीमुळे अक्षयने ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचे लाईक आणि डिस्लाइक केले हाईड?
2 “डॉक्टर डॉन या मालिकेमध्ये कबीर साकारताना…”, सांगतोय अनुराग वरळीकर
3 आर्याच्या विरोधात उभा ‘विराट’ खलनायक
Just Now!
X