मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखले जाते. नुकतीच तिने शार्दुल सिंह बयासशी लग्नगाठ बांधली. सध्या क्वारंटाइन वेळेत नेहा विविध खाद्यपदार्थ बनवण्यास शिकतेय. सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते. पण सध्या एका वेगळ्यात कारणामुळे सोशल मीडियावर तिची चर्चा सुरू आहे. ते कारण म्हणजे तिने नुकताच पोस्ट केलेला फोटो.

नेहाने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक कृष्णधवल फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमधील नेहाच्या बोल्ड व हॉट अंदाजावर चाहते घायाळ झाले आहेत. नेहाच्या बिकिनीतल्या या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘सुपर सिझलिंग’ म्हणत अभिनेत्री क्रांती रेडकरनेही नेहाच्या फोटोची प्रशंसा केली आहे.

आणखी वाचा : …म्हणून अमिताभ बच्चन यांनी सोनाली कुलकर्णीला पाठवलं स्वहस्ताक्षरातील पत्र

नेहा तिच्या बेधडक वक्तव्यांमुळेही कायम चर्चेत असते. शार्दुलसोबत तिच्या लग्नावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना नेहाने सडेतोड उत्तर दिलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लग्नापूर्वी शार्दुलसोबत लिव्ह-इनमध्ये राहिल्याचाही खुलासा केला.