News Flash

‘अनुष्काकडून काही शिक’, बाळाला सोडून फिरणाऱ्या करीनाला नेटकऱ्यांचा सल्ला

पाहा काय म्हणाले नेटकरी.

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई झालीय. तिच्या मुलाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र, करीनाने तिच्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर अनेक वेळा करीना बाहेर फिरताना दिसली आहे. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहुन नेटकऱ्यांनी करीनाला ट्रोल केलं आहे.

करीनाचा हा व्हिडीओ बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओत करीना गाडीतून उतरताना दिसत आहे. हा व्हिडीओ करीनाची खास मैत्रिण आणि बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराची बहिण अमृता अरोराच्या सोसायटी खालचा आहे. करीना अमृताला भेटायला तिच्या घरी गेली होती. मात्र, त्यावेळी करीनाचं दुसर बाळ तिच्या सोबत दिसत नाही आहे. यामुळे करीना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अनेक नेटकऱ्यांनी करीनाला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला,”खरचं कलयुग आहे नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला सोडून ही फिरत आहे.” दुसरा म्हणाला की “ही कशी आई आहे, जी आपल्या बाळाला सोडून आपल्या मैत्रिणींना भेटायला बाहेर जाते.” एवढंच नाही तर एक नेटकरी म्हणाला, “श्लोका अंबानी आणि अनुष्का शर्माकडून शिकून घे की गरोदरपणाचा आणि त्यानंतरचा काळ किती महत्त्वाचा असतो. हे तुमच्यावर आहे की तुम्ही किती कृतज्ञ आहात आणि त्याप्रमाणेच समाजात तुम्हाला वागणूक दिली जाईल.”

आई झाल्यानंतर करीनाला पहिल्यांदाचा नेटकऱ्यांनी ट्रोल केले असे नाही. अलीकडेच करीनाने करिश्मा कपूरची मुलगी समीराच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास हजेरी लावली होती. तेव्हा करीनाने तैमूरकडे पुरेसे लक्ष न दिल्याने तिला ट्रोल केले गेले. तेव्हाच तैमूरचे डोके काचेच्या दरवाज्याला आदळले होते, तर करीना फोटोग्राफर्सला पोझ देत होती. त्यावेळी तैमूरकडे लक्ष न दिल्याने करीना ट्रोल झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 10:55 am

Web Title: netizens criticise kareena kapoor khan for leaving her second child at home told her to learn from anushka sharma dcp 98
Next Stories
1 93व्या ऑस्कर नामांकनाची घोषणा, प्रियांका निकची धमाल
2 सोनाली कुलकर्णीची नव्या क्षेत्रात एण्ट्री, ‘या’ सिनेमाची करणार निर्मिती
3 “सन ऑफ सरदार” आहे का बुमराह? भारतीय शोधतायत त्याचं खानदान
Just Now!
X