News Flash

केआरकेने सुशांतवर केलेला जुना व्हिडीओपाहून नेटकरी संतापले…

त्याचे सुशांत विषयीचे आताचे आणि काही वर्षांपूर्वीचे मत पाहून नेटकऱ्यांनी सुनावले आहे.

कमाल आर खानचे प्रत्येक ट्विट चर्चेचा विषय ठरते. विविध विषयांवर कोणीही विचारले नसताना हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक त्याची मते मांडताना दिसतो. सेलिब्रिटी त्याच्या ट्विटकडे फारसे लक्ष देत नसले तरी नेटकरी मात्र त्याच्या ट्विटची आतुरतेने वाट पाहात असतात. १४ जून रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. अशातच केआरकेने या चर्चांना दुजोरा देत एक व्हिडीओ शेअर केला होता. पण दिग्दर्शक मिलाप जावेरी यांनी केआरकेचा व्हिडीओ शेअर करत एक वर्षापूर्वीचे सुशांत विषयीचे त्याचे मत आणि आताचे मत आधोरेखीत केले.

मिलाप यांनी केआरकेचा व्हिडीओ शेअर करत त्याला फेक म्हटले होते. त्यांनी शेअर केलेला व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. तो पाहून नेटकऱ्यांनी केआरकेला चांगलेच सुनावले आहे. केआरकेचा खरा चेहरा समोर आला आहे असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर हॅशटॅग KRK EXPOSED ट्रेंड होत होता.

काय म्हणाला व्हिडीओमध्ये केआरके?
काही दिवसांपापूर्वी सुशांतच्या बाजून बोलणाऱ्या केआरकेचे धक्कादायक वक्तव्य समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये केआरके सुशांतला अभिनय येतच नाही आणि एकता कपूरला त्यासाठी शिक्षा द्यायला हवी. कारण तिनेच सुशांतला लाँच केले आहे असे म्हटले आहे. तर पुढच्या व्हिडीओमध्ये केआरकेने सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यावेळी त्याने एक प्रश्न विचारला आहे की एक यशस्वी अभिनेता वयाच्या ३४व्या वर्षी आत्महत्या का करतो? सुशांतच्या जाण्याने मी खूप दु:खी आहे असे बोलताना तो दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 4:37 pm

Web Title: netizens dig out on krk old video avb 95
Next Stories
1 Dil Bechara Trailer : सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
2 झीटॉकीज घेऊन येत आहे खास १० चित्रपट
3 यशस्वी भव:! लता मंगेशकरांनी ‘या’ अज्ञात गायिकेला दिला आशीर्वाद
Just Now!
X