News Flash

सुगंधाने केली लता मंगेशकर यांची मिमिक्री, सांगितलं भोसले कनेक्शन

सुगंधाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कॉमेडी शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’ आहे. या शोच्या माध्यमातून घरा घरात पोहोचलेली कॉमेडियन सुगंधा म‍िश्राने काहि दिवसांपूर्वी लग्न केले. सुगंधाने कॉमेडियन संकेत भोसलेशी लग्न केले. त्यांच्या लग्नापासून गृहप्रवेशापर्यंतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता सुगंधाचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सुगंधाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ सुगंधाच्या लग्नातला असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत सुगंधा ही भारताची गाणं कोकीळा लता मंगेशकर यांची मिमिक्री करत असल्याचे दिसतं आहे. सुगंधा लता दीदींच्या स्टाईलमध्ये गाणं गात बोलते, “तसे तर मी पूर्ण प्रयत्न केले होते की, दीदींच्या कुटुंबाचा एक भाग बनू, म्हणून मी विचार केला की माझं आडनाव भोसले करुन घेऊ. कारण माझी लहान बहिण सुद्धा भोसले आहे ना..तर या प्रकारे सुगंधा दीदींच्या अजुन जवळ झाली..सुगंधा मिश्रा भोसले”, असे सुगंधा त्या व्हिडीओत बोलत आहे. सुगंधाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आता पर्यंत ६ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@sugandhamishra23)

आणखी वाचा : वाढत्या वयामुळे होणाऱ्या बदलांबद्दल प्रियांका म्हणते….

सुगंधा आणि संकेत २६ एप्रिल रोजी लग्न बंधनात अडकले. त्यांचा लग्नसोहळा जालंधर येथील कबाना क्लबमध्ये पार पडला होता. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांनी काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित लग्न केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 4:12 pm

Web Title: newlywed sugandha mishra mimics lata mangeshkar and it has an asha bhosle connection dcp 98
Next Stories
1 इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमधील वादावरून कंगना आणि इरफान पठाणमध्ये वादाची ठिणगी
2 Video: ‘बजरंगी भाईजान’मधील मुन्नीचा सलमानच्या ‘सीटी मार’ गाण्यावर डान्स
3 एकीकडे मुकेश खन्नांच्या निधनाची अफवा, तर दुसरीकडे बहिणीचा मृत्यू!
Just Now!
X